उन्नाव, 19 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशमधील उन्नावमधील (Unnao crime) दोन अल्पवयीन मुलींच्या (Two minor girls) संशयास्पद मृत्यूप्रकरणी (suspected deaths) उत्तरप्रदेश पोलिसांनी (UP Police) मोठा खुलासा केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आरोपी विनय आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना स्नॅक्स खाऊ घातल्यानंतर त्यांना कीटकनाशकं पाण्यात मिसळून पाजलं आहे. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून (One sided Love) झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
तसेच या दुर्दैवी घटनेतील तिसऱ्या पीडित मुलीवर कानपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला योग्य प्रतिसाद देत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. तिला हळू हळू व्हेंटिलेटरवरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तसेच ती लवकरात लवकर ठीक होईल अशी आशा आहे, असंही उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकरणाचा खुलासा करताना आयजी लक्ष्मी सिंह म्हणाले की, घटनेच्या दिवशी दोघेजण शेतातून पळताना दिसले होती. अशी माहिती शनिवारी सकाळी पोलिसांना गावातील एका प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना पाटकपुरा चौकातून ताब्यात घेतलं आहे.
हे ही वाचा -'उन्नाव महिलांसाठी नरक झालं आहे ...
पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला
आरोपी विनयची शेती पीडित मुलींच्या वडिलांच्या शेतीला लागूनच आहे. आरोपी विनय दररोज शेतात काम करण्यासाठी येथे येत असायचा. लॉकडाऊनच्या काळात विनयची या मुलींशी ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी विनयची एका मुलीशी मैत्री झाली होती. विनय या पीडित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पण मुलीने आरोपीला होकार दिला नव्हता. त्यामुळे आरोपीने या मुलींना शेतावर बोलावून त्यांना स्नॅक्स खायला दिले. त्यानंतर त्यांच्याशी बराच वेळ बोलत बसला.
हे ही वाचा - पाठीचा कणा मोडला, डोक्यावर दगडाने केले वार; पीडिता म्हणाली, रेप कर पण...,
याचवेळी आरोपी विनयने शेतातील कीटकनाशके पाण्याच्या बाटलीत मिसळलं. त्यातील एका अल्पवयीन मुलीला याच बाटलीतील पाणी पाजायचं होतं. यावेळी संबंधित मुलीसोबत आलेल्या दुसऱ्या दोन मुलींनी आरोपीकडे पाण्याची मागणी केली. पण आरोपी विनयने कीटकनाशकं मिश्रीत पाणी देण्यास नकार दिला. पण पीडित मुलींनी ती पाण्याची बाटली हिसकावून घेतली आणि कीटकनाशकं मिश्रीत पाणी प्यायली. यानंतर या मुली बेशुद्ध झाल्या. पोलिसांनी सांगितलं की, शेतातून पाण्याची बाटली, स्नॅक्सची पाकिटं, सिगारेटचे खोके आणि पान मसालाचे पाउच जप्त केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder news, Up Police