मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'पाठीचा कणा मोडला, डोक्यावर दगडाने हाणल्यानंतर मी म्हटलं, रेप कर पण....' बलात्कार पीडितेचा हादरवून टाकणारा अनुभव

'पाठीचा कणा मोडला, डोक्यावर दगडाने हाणल्यानंतर मी म्हटलं, रेप कर पण....' बलात्कार पीडितेचा हादरवून टाकणारा अनुभव

बलात्कारादरम्यान झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही.

बलात्कारादरम्यान झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही.

बलात्कारादरम्यान झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही.

भोपाळ 19 फेब्रुवारी : दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या निर्भया (Nirbhaya Case) बलात्कार आणि हत्या (Murder) प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. या घटनेतील आरोपींना फाशीही देण्यात आली मात्र, त्यानंतरही देशामध्ये बलात्काराच्या घटना काही कमी झाल्या नाहीत. दिवसेंदिवस बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशामध्ये दिल्लीच्याच या घटनेची आठवण करून देणारी घटना 16 जानेवारीला भोपाळमध्ये घडली.

भोपाळच्या कोलार परिसरामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निक्की (नाव बदलेलं आहे) असं या तरुणीचं नाव असून आरोपीनं तिच्या डोक्यावर दगड मारला. त्याने ढकलून दिल्यानं ती खडड्यात पडली त्यात तिच्या पाठीचा मणका तुटला. त्यानंतर तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही. या पीडित तरुणीनं दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

निक्की म्हणाली, 16 जानेवारीला मी संध्याकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे वॉकला निघाले होते. जे. के. रुग्णालयाच्या शेजारुन दानिशकुंज चौकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत होते. तेव्हा रुग्णालयापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या नर्सरीजवळ समोरुन एक तरुण येताना दिसला. जवळ आल्यानंतर त्याने मला जोरात धक्का दिला. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच फूट खोल खड्ड्यात पडले. त्यामुळे माझ्या पाठीचा मणका तुटला. त्याने मला जबरदस्ती ओढत झुडपामध्ये नेले. त्याने माझ्या शरीरारवर चावा घेण्यास सुरुवात केली. तो गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मी माझा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने मला मारहाण केली. मी जोरजोरात ओरडायला लागले, तर तो माझ्या डोक्यात दगड मारु लागला. मला समजत नव्हतं काय करु. क्षणभर मला वाटले की तो मला जिवंत नाही सोडणार. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मी त्याच्याकडे विनंती करु लागले. ‘तू माझ्यावर बलात्कार कर, मी अजिबात ओरडणार नाही. कोणाला फोनसुद्धा करणार नाही, पण तू माझा जीव घेऊ नकोस.

मला थोडासा श्वास घेऊ दे, असं मी त्याला म्हणाले. त्यानंतर त्याने मला दगड मारणं बंद केलं. मी मदतीसाठी आरडाओरडा केला. सुदैवानं माझा आवज तिथून जाणाऱ्या तरुण-तरुणीनं ऐकला. दोघंही झुडपामध्ये आले. त्या दोघांना पाहताच तो मला तिथेच सोडून पळून गेला, असं निक्कीनं सांगितलं.

दैनिक भास्करशी बोलताना ती पुढे म्हणाली,  बेशुद्ध होण्याआधी मला फक्त एवढंच आठवतंय, की त्या दोघांनी कोणाला तरी फोन करुन कार मागवली आणि त्यामध्ये मला घेऊन गेले. त्यांनी मला एम्स रुग्णालयात आणले. माझ्या पाठीचा मणका तुटला होता. डोक्याला गंभीर जखम झाली होती, अनेक टाके पडले. डॉक्टरांनी माझ्या मणक्यामध्ये रॉड टाकला. ऑपरेशन तर झाले पण मी माझ्या मनाने एक इंचसुद्धा हलू शकत नाही. माझ्या कमरेखालचा भाग पॅरेलिसमुळे सुन्न झालाय. डावा पाय सतत हलतोय. कमीत कमी पुढच्या सहा महिन्यांतील प्रत्येक सेकंद मला अंथरुणावरच घालवावा लागेल.

पुढे ती म्हणाली, की पोलीस आमची दिशाभूल करत आहेत. कोलार पोलीस 17 जानेवारीला एम्समध्ये आले. त्यांनी दानिशकुंज चौकाजवळील ज्युस सेंटरवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेतले. ज्यामध्ये तो मला समोरुन धक्का देताना दिसत आहे.

पोलीस तीन दिवस हेच सांगत होते, की आरोपी परिचित असावा. त्यानंतर 20 दिवसांनी त्यांनी अचानक सांगितलं, की महाबली नगरमधील एका तरुणानं गुन्हा कबूल केला असून त्याला अटक केली आहे. पण आजपर्यंत तो व्यक्ती मला दाखवला नाही. मी आरोपीच्या आवाजाचा ऑडिओ मागितला जेणेकरुन त्याला ओळखू शकेन, पण पोलिसांनी हेदेखील केलं नाही. हा जीवघेणा हल्ला होता, बलात्काराचा प्रयत्न होता. तरीसुद्धा पोलिसांनी सामान्य हल्ला म्हणून केस रजिस्टर केली.

माझी आई मला व्हिलचेअर, स्ट्रेचरवरुन पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास तयार आहे. जेणेकरुन आरोपीला मी ओळखू शकेल. पण पोलीस आरोपीचा फोटो दाखवत नाहीत किंवा त्याला माझ्यासमोर आणतही नाहीत. माझ्या आईनं या मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मदत मागितली. माझी इच्छा आहे, की त्यानं मला जेवढ्या यातना दिल्या आहेत तेवढ्याच यातानांनी तो तडपावा. यावर्षी दिवाळीपर्यंत मी नोकरी करत होते. आईला कोरोना झाल्यामुळे मला परत यावे लागले. आधी नोकरी गेली त्यानंतर हे घडलं.

दरम्यान, कोलार पोलीस ठाण्यातील अधिकारी सुधीर अरजरिया यांनी याप्रकरणी सांगितलं की, ही घटना घडली त्याठिकाणी एक मोबाइल नंबर अॅक्टिव्ह होता. जो हरियाणाच्या एका तरुणाचा होता. पण त्या तरुणाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या तरुणाला अटक केली. त्याच्याबद्दलची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती. याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. हा तरुण महाबलीनगरमध्ये राहणारा आहे.

First published:
top videos

    Tags: Rape, Rape accussed, Rape news