• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • सचिन वाझेंच्या घरी सापडला अज्ञात व्यक्तीचा पासपोर्ट; बनावट एन्काऊंटरचे धागेदोरे NIAच्या हाती

सचिन वाझेंच्या घरी सापडला अज्ञात व्यक्तीचा पासपोर्ट; बनावट एन्काऊंटरचे धागेदोरे NIAच्या हाती

मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) एक बनावट एन्काऊंटर (Fake encounter) करणार होते, हे NIA च्या तपासात उघड झालं होतं. मात्र वाझे नेमका कोणाचा एन्काउंटर करणार होते? याबाबतची काहीही माहिती NIA कडे नव्हती. गेले काही दिवस तपास केल्यानंतर NIA ने धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Share this:
मुंबई, 14 एप्रिल: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) एक बनावट एन्काऊंटर (Fake encounter) करणार होते, हे NIA च्या तपासात उघड झालं होतं. मात्र वाझे नेमका कोणाचा एन्काउंटर करणार होते? याबाबतची काहीही माहिती NIA कडे नव्हती. गेले काही दिवस तपास केल्यानंतर NIA ने धक्कादायक खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी एकूण दोन व्यक्तींचा बनावट एन्काऊंटर करण्याचा कट रचला होता. त्यापैकी एका व्यक्तीची ओळख NIA ने पटवली असून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या जीवाला अजूनही धोका असल्याचं NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाझेच्या घरावर NIA च्या दोन पथकांनी छापा टाकला होता. यावेळी वाझे यांच्या घरातून NIA च्या हाती एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट लागला होता. संबंधित पासपोर्ट सचिन वाझेच्या घरी कसा काय आला आणि यामागं काही दडलयं का? या प्रश्नाने NIA च्या अधिकाऱ्यांची झोप उडाली होती. मात्र या पासपोर्ट मागचं रहस्य समोर आलं आहे हा पासपोर्ट नेमक्या कोणत्या व्यक्तीचा आहे. तसंच तो व्यक्ती कोणत्या राष्ट्राचा नागरिक आहे, याबाबतची सर्व माहिती NIA च्या हाती लागली आहे. याच पासपोर्टमधील व्यक्तीचा बनावट एन्काऊंटर करण्याचा कट वाझे यांनी आखला होता, अशी माहितीही समोर आली आहे. कार मायकल रोडवरील जिलेटीन कांड्यांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचे सर्व आरोप या व्यक्तीवर टाकण्याचा कट सचिन वाझेने रचला होता. पण पोलिसांनी वाझे यांना अटक केल्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. पण या व्यक्तीच्या जीवाला अजूनही धोका असल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हे वाचा- Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात चावी ठरणार महत्त्वाचा पुरावा याव्यतिरिक्त वाझेंच्या घरात एकूण 62 पिस्तुलाच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या, याची माहिती यापूर्वीच एनआयएने न्यायालयात दिली आहे. संबंधित बनावट एन्काऊंटर करून प्रकाशझोतात येण्याची योजना वाझे यांनी आखली होती. वाझेंनी बनावट एन्काऊंटर करण्यासाठी दोन व्यक्तींची निवड केली होती. त्यातील एका व्यक्तीची ओळख पटली असून दुसरी व्यक्ती नेमकी कोण याचा शोध एनआयएकडून घेण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: