Home /News /crime /

धक्कादायक! मध्यरात्री घरात घुसून पोलीस हवालदारावर धारदार शस्त्रांनी वार; उपचारदरम्यान सोडला श्वास

धक्कादायक! मध्यरात्री घरात घुसून पोलीस हवालदारावर धारदार शस्त्रांनी वार; उपचारदरम्यान सोडला श्वास

अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली आहे.

    गडचिरोली, 05 जुलै: पोलीस (Police) आणि नक्षलवादी यांच्यातील संघर्ष गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. मात्र रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जे घडलं त्यामुळे खळबळ उडाली आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यांतील धोडराज पोलीस मदत केंद्रांत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या (Police constable) घरात घुसून काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करत (Crime news) त्यांची हत्या केली आहे. पोलीस हवालदार जगनाथ सिडाम (वय 53) असं मृत हवालदाराचं नाव आहे.  यांची राहत्या घरात अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळा चिरून (Attack on Police) हत्या केल्याची घटना नागेपली येथील वार्ड नं. २ मध्ये रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे वाचा - डॉक्टरकडे जातो सांगून गेला आणि... नवरदेवाचा मृतदेह पाहून कुटुंबाला धक्का मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस हवालदार जगनाथ सिडाम हे नागेपली इथल्या आपल्या राहत्या घरी झोपले असताना अज्ञात मारेकरूने त्याचा घरांचा दरवाजा ठोठावला. जगनाथ यांनी दरवाजा उघडताच मारेकऱ्यांनी धारदार चाकूनं त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ चंद्रपूर (Chandrapur) येते उपचारांसाठी नेलं असता डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी शोध सुरु केला आहे. मात्र पोलिसांवरच हल्ला करण्याइतकी गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे हे या घटनेनं उघड झालं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Attack on police, Crime news, Gadchiroli, Police

    पुढील बातम्या