वाशिम, 09 एप्रिल: वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहराजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead body found at Washim) आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रिसोड शहराच्या वाशिम महामार्गावर आढळला असून संबंधित मृत व्यक्तीचं वय साधारणतः 35 ते 40 च्या दरम्यान असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीची दोन दिवसांपूर्ण हत्या (Murder) झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली असून मृत्यूमागचं गुढ उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरानजीक वाशिम महामार्गावर 35 ते 40 वर्ष वय असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead found at Risod) आढळला आहे. अत्यंत वाईट अवस्थेत हा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर आज सकाळी स्थानिक लोकांनी हा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर, मृतदेहाची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. हा मृतदेह एका खताच्या पिशवीत गुंडाळलेला अवस्थेत पडला होता. तर परिसरात दुर्गंधीही सुटली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची अगदी बारकाईनं पाहणी केली आहे. मृतदेहाची अतिशय वाईट अवस्था पाहून पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने मृतदेह घटनास्थळीचं पुरला आहे. (हे वाचा- अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करून निर्घृण हत्या, जिल्ह्यात खळबळ ) संबंधित अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचं गुढ कायम असून पोलीस त्याच्या मृत्यूमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे सापडले नाहीत. परिसरात सीसीटीव्ही फुटेज आहेत का? याचीही चाचपणी केली जात आहे. संबंधित व्यक्तीची हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.