मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक वळण, अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला!

धक्कादायक वळण, अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

बीड, 06 मार्च : 'तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे' सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढल्याची घटनासमोर आली आहे. या तरुणीचा पोलीस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही घटना  दिनांक 04 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. पूजाची बहिण दिव्यांगा लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते.

त्यावेळी दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. तीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे दोघे फाऊंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यावेळी अनोळख्या तरुणीने पुन्हा एकदा फोन करून दोघांना शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसाकवला आणि पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण, काही अंतरावरच अनोळखी तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिव्यांगाला बोलावून मोबाईल चोरण्याचा हेतू नेमका काय होता? मोबाईल चोरी करणारी तरुणी कोण होती? त्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थितीत झाले आहे.

घडलेल्या घटनेनंतर दिव्यांगा आणि सौरभ यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनोळख्या तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती युवती कोण आणि तिने पूजाच्या बहिणीच्या मोबाईल का पळविला? याचा तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Beed, Crime, Mumbai, Pooja Chavan, Sanjay rathod, Stolen mobile phone, Suicide case