उल्हासनगर, 2 ऑक्टोबर : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी भरत थापा या तरुणाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक केली आहे. मोटारसायकल चोरी करण्याच्या संशयातून अपहरण ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. दीपेश रसाळ,गणेश फुलोरे, विशाल पाटील आणि नयन पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर भावेश भोईर आणि प्रमोद भोईर हे अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 27 सप्टेंबरला मारहाणीतून ही हत्या करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसात आरोपींची नावे पोलिसांना समजून सुद्धा अटक करायला इतका उशीर का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उल्हासनगरच्या चिंचपाडा भागात साई पूजा हॉटलमध्ये काम करणारे राजू थापा, रोशन थापा आणि भरत थापा यांना 10 ते 12 जणांच्या टोळीने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणातून अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत भरतचा मृत्यू झाला. दरम्यान या आरोपींनी भरतचा मृतदेह नेवाळी आणि मांगरूळ गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ फेकून दिला होता. हेही वाचा - बिहारमध्ये खळबळ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या याप्रकरणी राजू थापा याच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. अखेर या हत्येतील मुख्य आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.