जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / साडेसात हजार रुपयांचं इंजेक्शन 36 हजारांना, पोलिसांची मोठी कारवाई

साडेसात हजार रुपयांचं इंजेक्शन 36 हजारांना, पोलिसांची मोठी कारवाई

साडेसात हजार रुपयांचं इंजेक्शन 36 हजारांना, पोलिसांची मोठी कारवाई

ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचा तुटवडा भासत आहे. मात्र, या औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उज्जैन, 29 मे: कोरोना काळात अनेक जण ऑक्सिजन आणि औषधांअभावी (Oxygen cylinders and Medicines) प्राणास मुकले. तर कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय. कोरोनाच्या या कठीण काळात जिथे माणुसकी म्हणून लोक इतरांना मदत करत आहेत. तिथं औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्यात. त्यात आता ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचा तुटवडा भासत आहे. मात्र, या औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. मूळ किंमतीच्या दुप्पट ते तिप्पट रक्कम घेऊन या औषधांची विक्री केली जात आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये घडली आहे. इथं पोलिसांनी एका मेडिकलवर कारवाई केली.  मेडिकलचा चालक साडेसात हजार रुपयाचं इंजेक्शन तब्बल 36 हजार रुपयांना विकत होता.  महत्वाचं म्हणजे या मेडिकल दुकानदाराच्या पत्नीचं 15 दिवसांपूर्वी कोरोनानं निधन झालं आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उज्जैनचे SP सत्येंद्र शुक्ल यांना मुसद्दीपुरा येथील मानस एंटरप्राईजेसमध्ये ब्लॅक फंगसवर (black fungus) प्रभावी असलेलं इंजेक्शन (injection) मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उज्जैनच्या CSP पल्लवी शुक्ला ग्राहक बनून मानस एंटरप्राइजेस नावाच्या या मेडिकलमध्ये पोहोचल्या. मेडिकल दुकानदार जुगल किशोरने 7500 रुपये किंमतीच्या इंजेक्शनची किंमत 36 हजार रुपये सांगितली. काळाबाजार टाळण्यासाठी हे इंजेक्शन सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून (collector) वाटले जात आहेत. मात्र, तरीही याची उघडपणे जास्त किंमतीत विक्री सुरू होती. हेही वाचा-  ‘‘विरोधकांची घेत असलेली भेट योग्यच’’ , BJPच्या आमदाराचं संभाजीराजेंना समर्थन पोलिसांनी सांगितलं, की त्यांना हा मेडिकलचा मालक जास्त किंमतीत इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि त्यानंतर पोलीस अधिकारी पल्लवी शुक्ला ग्राहक बनून तिथं गेल्या. तेव्हा आरोपीने amphotericin b , liposomal amphotericin b आणि caspofungin injection या इंजेक्शनचे दर चार पट वाढवून सांगितले. तिन्ही इंजेक्शन 1 लाख रुपयात देण्यास आरोपी तयार झाला. त्यानंतर पल्लवी शुक्लांनी आरोपीला अटक करत इंजेक्शन जप्त केले. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच आरोपीच्या पत्नीचं कोरोनाने निधन झालंय. मात्र, तरीही हा मेडिकलचा मालक काळाबाजार करून लोकांकडून पैसे उकळत होता. त्यामुळं अशा कठीण काळातही लोकांमध्ये माणुसकी उरली नाहीय, असंच म्हणावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात