मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! नागपूरहून पुण्याकडे येत असताना धावत्या बसमध्ये तरुणीवर 2 वेळा बलात्कार

धक्कादायक! नागपूरहून पुण्याकडे येत असताना धावत्या बसमध्ये तरुणीवर 2 वेळा बलात्कार

संबंधित बलात्काराची (rape) घटना 5 जानेवारी रोजी रात्री घडली. यावेळी पीडित तरुणी नागपूरहून पुण्याला (From nagpur to pune) जाण्यासाठी खाजगी बसने (Private bus) प्रवास (Travel) करत  होती.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 12 जानेवारी: नाशिकमध्ये (Nshik) 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape) घटनेनंतर राज्यात महिला अत्याचाराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरवरून पुण्याला (From nagpur to pune) येणाऱ्या 21 वर्षीय युवतीवर चालत्या खाजगी बसमध्ये (Private bus) दोन वेळा बलात्कार (Two times rape) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित खाजगी बसच्या क्लिनरने (Cleaner) चाकूचा (Knife) धाक दाखवून युवतीवर प्रवासात दोनवेळा बलात्कार केला आहे. शिवाय घडलेली घटना कोणाला सांगितली तर चालत्या बसमधून बाहेर फेकण्याची धमकीही क्लिनरने दिली आहे.

संबंधित घटना 5 जानेवारी रोजी रात्री घडली. यावेळी पीडित तरुणी नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसने प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर बराच वेळ तिला उभा राहून प्रवास केल्यानंतर क्लिनरने तिला बसच्या मागच्या शीटवर बसण्यास सांगितलं. यावेळी संधीचा फायदा घेऊन क्लिनरने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर चालत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार केला आहे. या संतापजनक प्रकारानंतर याबाबत कोणाला सांगितल्यास चालत्या बसमधून फेकून देवू, अशी धमकीही संबंधित आरोपी क्लिनरने पीडित युवतीला दिली.

बस पुण्यात पोहचल्यानंतर पीडित युवतीने पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित घटना मालेगाव परिसरात घडली असल्यानं पुणे पोलिसांनी हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित खाजगी बस पुण्यातून जप्त केली आहे. सध्या आरोपी क्लिनर फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक नागपूरकडे रवाना झालं आहे.

तरुणी पुण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे

पीडित तरुणी मुळची गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी असून ती पुण्या जवळील कारेगाव येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिला तिच्या घरी पाठवण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Nagpur, Private bus, Pune, Rape