धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 5 एप्रिल : लहान मुलांना शाळेत कसं वागवावं याबाबत अनेक संकेत तसंच नियम आहेत. पण, शिक्षकांकडून त्या नियमांचं सर्रास उल्लघन होतं. मुंबईतील कांदिवली भागातही एक अशीच धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या शाळेतील दोन शिक्षिकांनी मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघड झालीय. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काय आहे प्रकरण? मुंबईतील कांदिवली पश्चिममधील प्री स्कुल शाळेतील हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये दोन महिला शिक्षक मुलांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यांना वर्गात मारल्याचं आणि जमिनीवर आदळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
त्याच शाळेत शिकणाऱ्या 2 वर्षांच्या मुलांच्या वडिलांनी हा सर्व प्रकार पहिल्यांदा पाहिला. त्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. त्या फुटेजच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात पैशासाठी बायकोचा सौदा; 3 हजार रुपये घेऊन केले मित्रांच्या हवाली जीनल शहा आणि भक्ती छेडा असं सीसीटीव्हीत मारहाण करताना दिसलेल्या शिक्षिकांची नावं आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत.