मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे दोघे गजाआड; दुचाकीसह 10 लाखांची कातडी जप्त

पुण्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे दोघे गजाआड; दुचाकीसह 10 लाखांची कातडी जप्त

Crime in Pune: पुण्याजवळील शिक्रापूर याठिकाणी बिबट्याच्या कातड्याची तस्करी (smuggling leopard skin) करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दहा लाख 25 हजार रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त केली आहे.

पुणे, 19 मार्च : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर याठिकाणी बिबट्याच्या कातड्याची तस्करी (smuggling leopard skin) करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दहा लाख 25 हजार रुपये किमतीची बिबट्याची कातडी आणि एक पल्सर दुचाकी जप्त केली आहे. पोलिसांनी सापळा रचून या या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे याठिकाणी दोन इसम बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दोन युवकांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून बिबट्याचं कातडं आणि पल्सर दुचाकी जप्त केली आहे. दत्तात्रय देवराम शिंदे आणि दादासाहेब रामदास थोरात असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

तालुक्यातील शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयाजवळ काही युवक बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती दिली. यानंतर उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार सहदेव ठुबे, अमरदिन चमनशेख, पोलीस नाईक सचिन मोरे, संतोष शिंदे, योगेश नागरगोजे, मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, निखील रावडे, अशोक केदार, राहुल वाघमोडे, प्रताप कांबळे, प्रतिक जगताप आदींनी त्या ठिकाणी सापळा रचला. संबंधित ठिकाणी दोन संशयित युवक दुचाकीवरून आल्याचे दिसताच पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली.

हे ही वाचा-पुण्यात आता गुंडांची खैर नाही, पोलीस स्टेशनकडून आजपासून अनोखा उपक्रम!

यावेळी पोलीस पथकाने संबंधित युवकांच्या पिशवीची झडती घेतली असता, काळे ठिपके असलेल्या बिबट्याचं कातडं सापडलं. यानंतर पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून अंदाजे दहा लाख रुपये किमतीचं बिबट्याचं कातडं जप्त केलं आहे. सदर दोन्ही आरोपींवर वन्यजीव अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Leopard, Pune crime news, Smuggling