Home /News /crime /

भारताशेजारील देशातील धक्कादायक प्रकार; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांना भर रस्त्यात घातल्या गोळ्या

भारताशेजारील देशातील धक्कादायक प्रकार; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांना भर रस्त्यात घातल्या गोळ्या

तालिबान्यांसोबत शांततेचा करार केल्यानंतरही या देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे

    काबूल, 17 जानेवारी : अफगाणिस्तानची (Afganistan) राजधानी काबुल (Kabul) पुन्हा एकदा हादरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) दोन महिला न्यायाधीशांची (two female judges) काही मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या (shot dead) केली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली असून या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना काबुलमधील पीडी 10 जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू (death) झाला असून तीन महिला गंभीर जखमी  आहेत. यासंदर्भात माहिती देताना टोलो न्यूजने सांगितलं की, काबूलच्या पीडी 10 जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन महिला जखमी झाल्या आहेत. हल्ल्यातील पीडित लोक सरकारी कर्मचारी असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं  म्हणणं आहे. काबुल पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. महत्त्वाच्या पदांवरील लोकांच्या हत्येत वाढ अलीकडच्या काही महिन्यांतच अफगाणिस्तान सरकारने तालिबान्यांसोबत शांततेचा करार केला होता. असं असतानाही देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. देशाची राजधानी काबुलमध्ये विशेषतः हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांची हत्या करणे, हा या हल्ल्यांचा मुख्य उद्देश आहे. ज्यामुळे देशात दहशतीचं वातावरण कायम राहू शकेल. अलीकडेच अमेरिकन सरकारने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी बोलावलं आहे. अफगाणिस्तातील अमेरिकन सैनिकांची  संख्या कमी करून ती 2500 करण्याची घोषणा केल्यानंतर हा हिंसाचार झाला आहे. हे ही वाचा-घरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO कार्यालयाकडे जाताना झाला हल्ला सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते अहमद फहीम क्विम म्हणाले की, दोन महिला न्यायाधीश गाडीने आपल्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना, त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांनी एफपीला बोलताना सांगितलं की, दुर्दैवाने आम्ही त्या दोन्ही महिलांचे प्राण वाचवू शकलो नाही. सध्या अफगाणिस्तानातील विविध न्यायालयात 200 हून अधिक महिला न्यायाधीश काम करत आहेत, अशी माहितीही अहमद फहीम यांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Shot dead

    पुढील बातम्या