मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Criminals Shot Dead in Encounter: मुख्तार अन्सारी गँगचे दोन शूटर एनकाऊंटरमध्ये ठार

Criminals Shot Dead in Encounter: मुख्तार अन्सारी गँगचे दोन शूटर एनकाऊंटरमध्ये ठार

उत्तर प्रदेश एसटीएफच्या एनकाऊंटरमध्ये दोन गुन्हेगार ठार (Criminals Shot Dead in an Encounter) झाले आहेत. वकील पांडे (Vakil Pandey) आणि अमजद (Amzad) अशी ठार झालेल्या गुन्हेगारांची नावं आहेत.

    प्रयागराज ०४ मार्च : उत्तर प्रदेश एसटीएफच्या एनकाऊंटरमध्ये दोन गुन्हेगार ठार (Criminals shot dead in an encounter) झाले आहेत. प्रयागराजमधील नैनी अरैल भागात हा एनकाउंटर झाला. वकील पांडे (Vakil Pandey) आणि अमजद (Amzad) अशी ठार झालेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. हे दोघेही २०१३ मधील उप जेलर अनिल कुमार त्यागी (Deputy Jailer Anil Kumar Tyagi) यांच्या हत्येमध्ये सहभागी होते. गँगस्टर मुन्ना बजरंगी (gangster Munna Bajrangi) आणि मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांच्या सांगण्यावरुन आरोपींनी ही हत्या केली होती. दोघांच्या ताब्यातून तीस जिवंत काडतुसे आणि नऊ एमएम पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील पांडेवर ५० हजारांचा इनाम घोषित होता. हे दोघंही मुन्ना बजरंगी, मुख्तार अन्सारी गँगचे शूटर होते. मात्र, मुन्ना बजरंगीच्या मृत्यूनंतर ते दिलीप मिश्रासाठी काम करत होते. या दोघांनी रांचीच्या होटवार जेलमधील जेल अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रयागराजमध्येही प्रभावशाली व्यक्तीच्या हत्येचा कट होता. एसटीएफच्या म्हणण्यानुसार, वकील पांडे आणि त्याच्या साथीदार अमझद दोघेही भदोहीचे रहिवासी आहेत. मागील वर्षी भदोहीचे आमदार विजय मिश्रा यांनी वकील पांडेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. दोघांनी अन्य साथीदारांसोबत मिळून २०१३ मध्ये मुन्ना बजरंगी आणि मुख्तार अन्सारी यांच्या इशाऱ्यावर वाराणसीचे उप जेलर अनिल कुमार त्यागी यांची निर्घृण हत्या केली होती. मागच्याच वर्षी माफिया दिलीप मिश्राच्या कॉलेजमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या खान मुबारक गँगच्या शार्प शूटर नीरज सिंहनं काही सपा नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा केला होता, यात हे दोघंही सहभागी होते. धनबादचे उपमहापौर नीरज सिंह यांच्या हत्येमध्ये सामील मुन्ना बजरंगीचा शार्प शूटर अमन सिंह सध्या रांचीच्या होटवार कारागृहात आहे. त्याच्याच सांगण्यावरुन वकील पांडे आणि अमजद आपल्या साथीदारांसोबत मिळून होटवार जेल अधिकाऱ्याच्या हत्येचा कट रचत होते. मागच्याच महिन्यात त्यांचा एक साथीदार अयोध्यामध्ये पकडला गेला, त्यामुळे ही घटना टळली. पोलिसांचा दावा आहे, की दोघेही प्रयागराजमध्यो प्रसिद्ध किंवा राजकीय व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नात होते. वकील पांडेवर जवळपास २० तर अमजदवर २४ गुन्हे दाखल आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्या साथीदारांचाही तपास सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime, Criminal, Gangster, Murder news, Police Encounter, Uttar pardesh

    पुढील बातम्या