पाटणा, 01 मे: कोरोना प्रतिबंधात्मक लस (Coronavirus Vaccine) देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका तरुणीला लस देण्याचं आमिष दाखवत एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. बलात्कारास विरोध केला असता आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तोंडात रुमालही कोंबला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही नराधम आरोपींना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना बिहारमधील (Bihar Rape Case) जमुनापूर परिसरातील आहे. येथील एका तरुणीला आरोपी रॉकी आणि मंटूने कोव्हिड लस देण्याचं आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका निर्जन घरात नेलं. याठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपी रॉकी आणि मंटूने पीडितेचे हात-पाय घट्ट बांधले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेच्या तोंडात रुमालही कोंबला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हे वाचा- माझ्याकडून पैसे घेते आणि इतर लोकांसोबत बोलते, संतापलेल्या प्रियकरानं उगवला सूड बलात्कार केल्यानंतर आरोपी नराधमांनी तरुणीला घटनास्थळीच सोडून पळ काढला. यानंतर पीडित तरुणी कशीबशी स्वतःची सुटका केली आणि घरी पोहचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगाची माहिती घरच्यांना दिली. पीडित मुलीनं घडलेल्या प्रसंगाची माहिती देताच, पालकांनी जमुनापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. हे वाचा- नवरा-मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली महिला; पुढे असं काही घडलं तिला बसला धक्का या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, संबंधित दोन्ही आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचे होते. दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीडित मुलीची वैद्यकिय चाचणी केली असता तिच्यावर बलात्कार केल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन्ही आरोपी विरोधात 376D कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या पीडितेच्या वयाबद्दल माहिती घेतली जात आहे. तिचं वय जर 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर गुन्ह्यात पोक्सो कलमाचाही समावेश करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.