लखनऊ, 19 नोव्हेंबर : हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी 76 बेपत्ता मुलांना शोधून 60 दिवसांच्या आत त्यांना त्यांच्या घरी पोहोचवल्याबद्दल आउट-ऑफ-टर्न प्रमोशन (OTP) मिळालं आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांमध्ये अशा पद्धतीने प्रमोशन मिळवणाऱ्या त्या पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत. या हरवलेल्या मुलांपैकी 56 मुले 14 वर्षांखालील आहेत. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची मुलगी असलेल्या ढाका यांनी सांगितलं की, त्यांना पोलिस दलात रुजू व्हायचं होतं आणि 2006 मध्ये ज्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांत नोकरी लागली, तेव्हा त्यांचं हे स्वप्न साकार झालं. “मला माझ्या कामासाठी मिळालेलं बक्षीस आणि कामाचा झालेला गौरव यामुळे मी खूष आणि समाधानी आहे. अशा OTP आम्हाला अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. इतक्या लवकर मला असिस्टंट सब इन्स्पेक्टरचं पद मिळेल याची कल्पनाही मी केली नव्हती. साधारणपणे हेड कॉन्स्टेबल पदावर 10 वर्षांच्या नोकरीनंतर ते पद मिळू शकतं हे मला माहीत होतं,” असं त्या म्हणाल्या. ढाका यांनी आउटर दिल्ली, राष्ट्रीय राजधानीत आणि अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा दिली आहे. 2014 मध्ये त्यांचं प्रमोशन, हेड कॉन्स्टेबल पोस्टवर झालं त्यावेळी त्यांची दक्षिण पूर्व दिल्ली येथे नेमणूक झाली. 2017 मध्ये त्यांची साउथ ईस्ट दिल्ली जिल्ह्यात बदली झाली.
(वाचा - ‘डायन’ म्हणत महिलेला केली मारहाण; बाजारात निर्वस्त्र केल्याचा आरोप )
विनयभंगाच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या अनुभवी ढाका म्हणाल्या, त्यांच्याकडे करण्यासाठी काम बरंच होतं, परंतु त्यांना आणखी काम करायचं होतं. दिल्ली पोलिस कमिशनर एस. एन. श्रीवास्तव यांनी बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकरिता प्रमोशन देण्याच्या पुढाकाराविषयी योजना जाहीर केल्याचं ऐकल्यावर गुन्ह्यांचा शोध घेण्यास आणखी प्रोत्साहन मिळालं. “मी बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्याची परवानगी देण्याची विनंती माझ्या वरिष्ठांना केली. मी आधीच आश्वासन दिलं होतं की, ज्या केसेसवर मी आधीच काम करत आहे, त्यांच्यात काही चूक होणार नाही किंवा त्यांच्या चौकशीला उशीर देखील होणार नाही,” असं त्या म्हणाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला.
(वाचा - वीजेच्या खांबाला बांधून पत्रकाराला मारहाण;बेकायदेशीर गुन्हे उघड केल्यानंतर हल्ला )
त्यानंतर ढाका यांनी हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी दोन महिन्यांचं लक्ष्य ठेवलं होतं. तिच्या बर्याच केसेसमध्ये अशी मुलं होती, जी आपल्या कुटूंबापासून दूर झाली होती आणि अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. यापैकी काही केसेस 2013 सालाच्या देखील होत्या. “त्यावेळेस या केसेस सॉल्व्ह झाल्या नव्हत्या, परंतु मी इनपुट एकत्रित केलं आणि त्या सोडवल्या,” असं ढाका यांनी सांगितलं. “मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे ज्यावेळी लोकांना कळलं तेव्हा त्यांनी अधिक माहिती देण्यास सुरूवात केली.” ढाका नोकरीकडे समाधानाच नव्हे, तर त्या त्याला एक सामाजिक सेवा म्हणून पाहतात. त्यांनी सांगितलं की, मुलांची त्यांच्या घरच्यांसोबत भेट करून दिल्यानंतर, त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या आशीर्वादाचं तिला कौतुक वाटतं. ढाका एका आठ वर्षांच्या मुलाची आई आहेत. कामात व्यस्त राहिल्यामुळे त्या आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, घरी जाऊ शकत नाही. परंतु त्यांचा हेड कॉन्स्टेबल नवरा त्या दूर असताना त्यांच्या मुलाची काळजी घेतो.
(वाचा - चांगली दिसत नाही म्हणून झालं ब्रेकअप; पण सर्जरी केली आणि…पाहा VIRAL PHOTO )
“माझा मुलगा मला भेटण्यासाठी दिवस मोजायचा. तो मला आठवण करून देत असतो की मी त्याला इतक्या दिवसांत भेटले नाही,” सासरच्यांनीही हरवलेल्या मुलांना शोधण्याच्या मोहिमेस पाठिंबा दिला, असल्याचं त्या म्हणाल्या. प्रमोशननंतर बेपत्ता झालेल्या मुलांना शोधण्याची आवड कमी होणार नाही. खरं तर, OTP ने त्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.