ही मुलगी 17 वर्षांची आणि इयत्ता अकरावीत असताना, तिच्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) ती चांगली दिसत नाही म्हणून ब्रेकअप केलं होतं. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
व्हिएतनामच्या (Vietnam) या मुलीने सांगितंल की, ती चांगली दिसत नसल्याने तिचा बॉयफ्रेंड तिला कोणालाही भेटवत नव्हता. काही दिवसांतच दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली. आता प्लास्टिक सर्जरीनंतर ती अतिशय सुंदर दिसू लागली आहे. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
व्हिएतनामच्या सोशल मीडियावर या मुलीची मोठी चर्चा आहे. बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर केवळ 19व्या वर्षात तिने प्लास्टिक सर्जरी केली. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
21 वर्षीय गुयेन तुओंग वीएन हिने सांगितलं की, अकरावीत असताना ब्रेकअपनंतर आपलं रंग-रूप बदलण्याचा निर्णय घेतला. तिचं बॉयफ्रेंडवर अतिशय प्रेम होतं. पण तिच्या रुपामुळे तो तिला आपल्या मित्रांशी भेटवत नसे. परंतु एकदा पार्टीमध्ये असताना त्यांचं ब्रेकअप झालं. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
पार्टीत असताना लोक तिच्याकडे इशारा करत काहीतरी कुजबुजत होते. इतक्या सुंदर मुलाला अशी गर्लफ्रेंड कशी मिळाली अशी चर्चा करत असल्याचं, तुओंग वीएन हिने सांगितलं. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
17 वर्षांच्या मुलीसाठी पार्टीत झालेली चर्चा अतिशय निराशाजनक ठरली होती. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
तिने स्वत: बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्याचं ठरवलं आणि त्यानेही तिला लगेचच सहमती दिली. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
बॉयफ्रेंडच्या या लगेचच मिळालेल्या निर्णयाने आणि त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्यावर तिला अधिकच धक्का बसला. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)
तिच्या आईनेही तिला सर्जरीसाठी सहमती दिली. आता सर्जरीनंतर ती अतिशय सुंदर दिसत असून सर्वच जण तिचा लूक पाहून हैराण आहेत. (फोटो क्रेडिट- kienthuc.net.vn)