• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लैंगिक शोषणाच्या भावनेविना मुलीच्या गालाला हात लावणे हा गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

लैंगिक शोषणाच्या भावनेविना मुलीच्या गालाला हात लावणे हा गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

एखाद्या व्यक्तीने मुलीच्या गालाला (Child's cheek) हात लावला आणि त्यामागे त्याचा लैंगिक शोषणाचा (Sexual harassment) उद्देश नसेल, तर तो गुन्हा (Crime) ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑगस्ट : एखाद्या व्यक्तीने मुलीच्या गालाला (Child's cheek) हात लावला आणि त्यामागे त्याचा लैंगिक शोषणाचा (Sexual harassment) उद्देश नसेल, तर तो गुन्हा (Crime) ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. लहान मुलांच्या गालाला हात लावणे, हा प्रकार कौतुकाने, लाडाने किंवा प्रेमानेही केला जातो. त्यामुळे प्रत्येकवेळी केवळ गालाला हात लावणे, हा गुन्हा ठरू शकत नाही. त्यामागे जर लैंगिक शोषण करण्याचा उद्देश सिद्ध झाला, तरच तो गुन्हा ठरवण्यात येईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काय होतं प्रकरण मुंबईत मोहम्मद अहमद उल्ला याला जुलै 2020 मध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. एका 8 वर्षांच्या मुलीला आपल्या दुकानात नेऊन तिच्या गालाला हात लावण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. आपल्या दुकानात नेल्यानंतर मोहम्मदनं या मुलीच्या गालाला हात लावला. त्यानंतर आपला शर्ट काढून ठेवला आणि ट्राऊझर काढण्याच्या बेतात असतानाच एक महिला तिथं आली. तिनं हा प्रकार पाहून मोहम्मद अहमद उल्ला याच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. हे वाचा -पतीनं खात्यात जमा केले 39 लाख रुपये; पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी व्यापारी संघर्षातून प्रकार घडल्याचा दावा मोहम्मद याचं मांस विक्रीचं दुकान असून आपल्या प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांनी आपला काटा काढण्यासाठी मुद्दाम हे कारस्थान रचल्याचा दावा मोहम्मदनं कोर्टात केला होता. जुलै 2020 पासून मोहम्मद तळोजा जेलमध्ये बंद असून आपला काहीही दोष नसताना जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. यामुळे आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय बंद झाला असून कुटुंबाचे हाल होत असल्याचंही त्यानं कोर्टाला सांगितलं. त्यानंतर लैंगिक शोषणाच्या उद्देश नसताना जर लहान मुलीच्या गालाला हात लावले, तर तो गुन्हा होत नाही, असं सांगत कोर्टाने मोहम्मदला जामीन मंजूर केला आहे. मात्र या निकालाचा इतर खटल्यांसाठी कुठलाही संदर्भ घेण्यात येऊ नये, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
  Published by:desk news
  First published: