मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मंदिरातून देवालाच घेऊन गेले कोर्टात; पण त्यालाही मिळाली पुढची तारीख, अजब खटला

मंदिरातून देवालाच घेऊन गेले कोर्टात; पण त्यालाही मिळाली पुढची तारीख, अजब खटला

देवालाही तारीख पे तारीख...

देवालाही तारीख पे तारीख...

देवालाही तारीख पे तारीख...

रायपूर, 25 मार्च : छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे महसूल अधिकाऱ्यांनी देवालाच आरोपी ठरवून न्यायालयात हजर केलं आहे. रायगडमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम भगवान शंकरांला अतिक्रमणाची नोटीस बजावली. त्यानंतर न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यास सांगण्यात आले. आता देव स्वतः येऊ शकत नाही, अशा स्थितीत स्थानिकांनी शिवलिंग उचकटून कोर्टात आणले. येथेही तहसीलदार न सापडल्याने न्यायालयाने त्यांना पुढची तारीख दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये अतिक्रमण आणि अवैध बांधकामावरुन हायकोर्टात रिट पेटिशन दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात रायगड तहसील कोर्टाने 23 ते 24 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी सीमांकल दलाचं गठण करून कौहाकुंडा गावात तपास केला. यात अनेकांनी अवैध बांधकाम केल्याचं समोर आलं. यानंतर कोर्टाकडून 10 जणांना नोटीस पाठवण्यात आली. याशिवाय हजर न राहिल्यास 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

कोर्टाने शिव मंदिरासह 10 जणांना पाठवली नोटीस...

या प्रकरणात शुक्रवारी सुनावणीची तारीख ठरवण्यात आली. कोर्टाकडून ज्या 10 लोकांना नोटीस पाठवण्यात आली, त्यात कोहाकुंडाच्या वॉर्ड 25 मधील शिव मंदिरदेखील आहे. यात कोणी पुजारी नसल्यामुळे शिव मंदिराला नोटी पाठवण्यात आली. यावेळी 10 हजारांचा दंड ठोठावण्यात असल्याचंही सांगितलं होतं. अशावेळी स्थानिकांनी मंदिरातून शिवलिंगच उचकटून ट्रॉलीवर ठेवून कोर्टात नेलं.

हे ही वाचा-बापरे! हात लावताच तुटतात हाडं; 12 वर्षांच्या मुलाला विचित्र आजार

कोर्टात पोहोचल्यावर मिळाली पुढची तारीख...

शिवलिंग घेऊन स्थानिक कोर्टाक पोहोचले. त्यावेळी बाहेर नोटीस लावली होती, की खंडपीठाचे अधिकारी दुसऱ्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे या केसची पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी करण्यात येईल. दुसरीकडे तहसीलदार गगन शर्मा यांनी सांगितलं की, नोटीसबाबत त्यांना माहिती नव्हती. नोटीस नायब तहसीलदार यांनी जारी केली होती. जर त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यात सुधारणा केली जाईल.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Court