मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बापरे! हात लावताच तुटतात हाडं; 12 वर्षांच्या मुलाला विचित्र आजार

बापरे! हात लावताच तुटतात हाडं; 12 वर्षांच्या मुलाला विचित्र आजार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

12 वर्षांच्या मुलाला जन्मापासूनच हा आजार आहे. इतके वर्षे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण काहीच फायदा झाला नाही.

    लखनऊ, 23 मार्च :  धावताना पडणं, खेळताना लागणं यामुळे मुलांचं हाड तुटल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण कधी कुणी फक्त स्पर्श केला, हात लावला तरी मुलांचं हाड तुटलं असं ऐकलं आहे. पण उत्तर प्रदेशमधील एका मुलाच्या बाबतीत असं होत आहे. या मुलाला असा आजार झाला आहे, ज्यामुळे साधा हात लावला तरी त्याची हाडं तुटतात (Child bone break after touching). अलिगडच्या घुडिया बाग परिसरात राहणारा 12 वर्षांचा रोहित. कुणीही त्याच्या शरीराला हात लावली तर त्याची हाडं तुटतात. त्याचं शरीरही वाकडंतिकडं आहे. रोहित जन्मताच असा आहे. रोहितच्या आईने सांगितलं, रोहितचा जन्म 2012 साली मलखान सिंह हॉस्पिटलमध्ये झाला. जन्मताच तो खूप रडत होता. शरीरातील कित्येक भागाची हाडं तुटली होती. आम्ही खूप ठिकाणी उपचार करून पाहिले पण काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनीही खूप प्रयत्न केले पण रोहित बरा झाला नाही. अवस्था इतकी भयंकर असूनही तो आपल्या दुकानात बसतो. पण ग्राहकांना सामान देऊ शकत नाही. ग्राहक येताच तो आपल्या कुटुंबातील सदस्यांना हाक मारून बोलावतो. हे वाचा - धक्कादायक! Toffee खाताच चिमुकल्यांचा गेला जीव; 4 मुलांचा मृत्यू टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार रोहितने सांगितलं, "मला कुणीही उचलून घेतलं तरी माझी हाडं तुटतात. मला फक्त आईच उचलू शकते आणि मी दुकानात बसतो. आई घरातील काम करत राहते" रोहितला ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा (Osteogenesis imperfecta) नावाचा आजार आहे. "याबाबत माहिती देताना बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप बन्सल यांनी सांगितलं की ऑस्टियोजेनेसिस इंपरफेक्टा हा आजार  50,000 पैकी एका मुलात असतो. या मुलांचं आयुष्य खूप कमी असतं. कुटुंबाच्या देखभालीवर ही मुलं अवलंबून असतात" रोहितची आई म्हणाली, "मी रोहितचं अॅडमिशन शाळेत करायला गेली होती पण त्याचं अॅडमिशन झालं नाही. घरातील मुलंच त्याला शिकवतात" हे वाचा - कोरोनाचा लहान मुलांवर वाईट परिणाम! NCEE सर्वेक्षणात धक्कादायक गोष्टी समोर, तुमच्याही मुलांसोबत असं होतं का? माझे पती दररोज 200 रुपये कमवातात. कसंबसं आम्ही संसाराचा गाडा हाकतो. मी बरेच वर्षे रोहितवर उपचार केले पण आता माझ्याकडेही पैसेही शिल्लक नाहीत. आम्ही खूप गरीब आहेत. सरकारने काही मदत केली तर माझ्या मुलाचे उपचार होऊ शकतील, असं म्हणत तिने मुलावर उपचार व्हावेत यासाठी सरकारसमोर मदतीसाठी पदर पसरला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Rare disease, Serious diseases, Small child

    पुढील बातम्या