नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : दिल्लीतील रोहिणी भागात एका ग्राहकाने पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यामागील कारण समजल तर तुम्हालाही धक्का बसेल. दिल्लीतील एका गृहस्थाने आपल्या भाच्याला Online क्लास अटेंड करता यावं यासाठी एक मोबाइल घेऊन दिला. मात्र मोबाइल घेतल्याच्या एक महिन्यातच असा प्रकार घडला की या गृहस्थाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या गृहस्थाने मोबाइल कंपनीच्या सर्विस सेंटरकडे त्याचा बिघडलेला मोबाइल बदलण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी यास नकार दिला. त्यातच गृहस्थाने दुकानासमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. सध्या या व्यक्तीची प्रकृती ठीक आहे. या व्यक्तीचं नाव भीस सिंह असल्याचे समोर आले असून रोहिणी साऊथ ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. भीम सिंहने पोलिसांना सांगितले की, एक महिन्यापूर्वी प्रल्हादपूरातील एका दुकानातून त्यांनी मोबाइल खरेदी केला होता. शाळेत ऑनलाइन क्लास अटेंड करता यावं यासाठी त्यांनी हा मोबाइल आपल्या भाच्याला गिफ्ट केला होता. काही दिवसांनंतर फोन बिघडला आणि फुटला. त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी मोबाइल कंपनीच्या सर्विस सेंटरकडून रिप्लेसमेंट करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र कंपनीच्या पॉलिसीचं कारण देत त्यांनी फोन रिप्लेस करण्यास नकार दिला. त्यांनी पुन्हा मेल पाठवला. मात्र काही फायदा झाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही मोबाइल रिप्लेस केला जात नाही यातून त्यांनी धक्कादायक पाऊल उचललं. हे ही वाचा- नदीत मासे पकडताना काट्यात अडकली मगर; शेवटी रुग्णालयातच करावी लागली रवानगी ते शुक्रवारी साधारण 12 वाजता रोहिणीच्या एम-2 जवळ पोहोचले. त्यांनी सेंटरच्या कर्मचाऱ्याला पुन्हा विनंती केली. मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर भीम यांनी स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावली. घटनास्थळी हजर असलेले बचाव करण्यासाठी तत्काळ पुढे आले. त्यांना लागलीच बीएसएच्या रुग्णालयात नेण्यात आले, येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीचं, त्याची पत्नी आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब घेतला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







