सूचना मिळताच वन्यजीव आणि उत्तर प्रदेशातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम तेव्हा पोहोचली. टीमने मगरीवर मेडिकल ट्रिटमेंट सुरू केलं. याची माहिती क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. जखमी मगरीला आग्राच्या वाइल्ड लाइफ एसओएस रुग्णालयात आणण्यात आले, येथे तिचा एक्सरे काढण्यात आला. एक्सरेमध्ये तिच्या तोंडात तब्बल 3 सेंटीमीटर लांबीचं हुक अडकलेलं दिसत होतं.