डोंबिवली, 23 डिसेंबर : बायकोची हौस भागवण्यासाठी पती जीवच रान करतो, असं अनेकदा पाहायला मिळत. मात्र अंबरनाथच्या (Ambernath News) पालेगावात राहणाऱ्या एका पठ्ठ्य़ाने बायकोची हौस भागवण्यासाठी चक्क दुचाकी चोरीचा सपाटा लावला. यासाठी त्याने आपली टोळी तयार करुन चक्क 39 दुचाकी आणि दुचाकीचे इंजिनाची चोरी केली. पोलिसांनी या दुचाकी चोरीच्या टोळीचा माग काढत अखेर टोळीचा प्रमुख आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हा चोरटा महागड्या दुचाक्या चोरी करायचा. त्या विकायचा आणि मिळेल त्या रकमेतून बायकोची हौस मौज भागवयाचा. दीपक सलगरे हा आपल्या एका साथीदारासह महागड्या दुचाक्या चोरी करायचा, त्यानंतर या दुचाक्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून गरजूंना स्वस्तात विकायचा. काही दुचाक्या भंगारवाल्याला विकायचा, हा भंगारवाला दुचाकी तोडून भंगारात विकायचा. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे. दीपक सलगरेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कल्याण डीसीपी संजय गुंजाळ यांनी नागरिकांनी स्वस्त दुचाकीचा आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाक्या विकत घेऊ नये असं आवाहन नागरिकांना केलं आहे. अन्यथा इथून पुढे अशा दुचाक्याविकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने या परिसरात दुचाकी चोरी झालेले आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवले. संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. दीपक विरोधात मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठल वाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर आणि कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत. अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे हा आपल्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती. दीपक मोटरसायकल चोरी करायचा आणि ती मोटर सायकल त्याचा साथीदार राहुल डावरे यांच्या मदतीने नागरिकांना स्वस्त गाड्यांच्या आमिष दाखवून विकायचा. हे ही वाचा- डोअरबेल वाजवली,दार उघडताच नमस्कार करण्यासाठी वाकला खाली; काही सेकंदात खेळ खल्लास या गाड्या फायनान्स कंपनी मधून खेचून आणल्या आहेत असे आमिष देत या चोरीच्या गाड्या ग्राहकांच्या माथी मारत होता. तसंच काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू यांनादेखील विकल्या, बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्या मार्फत इतराना विकत होता. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरे सहा सहा जणांना ताब्यात घेतलं या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी 17 दुचाक्या 23 दुचाक्यांचे इंजिन इतर पार्ट्स, एक कटर मशीन असा आठ लाख 24 हजार यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.