मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रताप; प्रेमाच्या खुळाने थेट तुरुंगात पोहोचवलं

एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रताप; प्रेमाच्या खुळाने थेट तुरुंगात पोहोचवलं

बॉयफ्रेंड आपला माग काढतोय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं. पण याचदरम्यान ख्रिस्तोफर हा प्रेयसीला ती रात्री उशिरापर्यंत फिरते (Night Out) आणि पार्टीला जाते याबद्दल विचारत होता. तेव्हा हा प्रकार उघड झाला.

बॉयफ्रेंड आपला माग काढतोय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं. पण याचदरम्यान ख्रिस्तोफर हा प्रेयसीला ती रात्री उशिरापर्यंत फिरते (Night Out) आणि पार्टीला जाते याबद्दल विचारत होता. तेव्हा हा प्रकार उघड झाला.

बॉयफ्रेंड आपला माग काढतोय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं. पण याचदरम्यान ख्रिस्तोफर हा प्रेयसीला ती रात्री उशिरापर्यंत फिरते (Night Out) आणि पार्टीला जाते याबद्दल विचारत होता. तेव्हा हा प्रकार उघड झाला.

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : जगात सर्वांत लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड (Trusted Brand) म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने (Apple) बरीच उत्पादनं बाजारात आणली आहेत. तरुणांसह उच्चभ्रू लोकांत तर आयफोनला (iPhone) प्रचंड पसंती मिळते. याची वैशिष्ट्ये अनेकांना भुरळ घालतात. पण अ‍ॅपलच्या एअर टॅग (Apple AirTag) या ट्रॅकिंग डिव्हाइसचा (Tracking Device) लोकांकडून दुरूपयोग केला जात आहे. अ‍ॅपल एअरटॅगद्वारे एका व्यक्तीने त्याच्या आधीच्या प्रेयसीवर (Ex-Girlfriend) नजर ठेवल्याचा प्रकार यूकेमध्ये उघड झाला. 41 वर्षीय ख्रिस्तोफर पॉल ट्रॉटमन (Christopher Paul Trotman) त्याच्या आधीच्या प्रेयसीला सतत फोन करून त्रास देत होता. त्यानंतर त्याने ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅपलचे एअर टॅग (AirTag) मागवण्यासाठी ऑर्डर दिली. त्यानं हे ट्रॅकिंग डिव्हाइस प्रेयसीच्या कारमध्ये लावलं. यावरून प्रेयसी कुठे जाते, कुणाला भेटते आदी सर्व माहिती मिळू लागली. डेली मेलमधील रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, ख्रिस्तोफर मागील 10 वर्षांपासून प्रेयसीसोबत नात्यात होता. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. व्हायोलिनच्या बहाण्याने पळवून नेलं, 6 महिन्यांनी विद्यार्थिनीसोबत पकडलं या अवस्थेत; बायकोनेही घेतला बदला ख्रिस्तोफरच्या प्रेयसीने मार्च 2022 मध्ये नवा आयफोन खरेदी केला. यानंतर तिला एअरटॅगचं नोटिफिकेशन मिळालं. सुरूवातीला त्या प्रेयसीने एअरटॅगला फोनसोबत कनेक्ट करण्याच्या विनंतीकडं (Connect Request) दुर्लक्ष केलं. बॉयफ्रेंड आपला माग काढतोय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं. पण याचदरम्यान ख्रिस्तोफर हा प्रेयसीला ती रात्री उशिरापर्यंत फिरते (Night Out) आणि पार्टीला जाते याबद्दल विचारत होता. तेव्हा हा प्रकार उघड झाला. एअरटॅगच्या माध्यमातूनच आरोपीचा काढला माग ख्रिस्तोफर जुन्या प्रेयसीवर एअरटॅगद्वारे लक्ष ठेवत होता. प्रेयसीला एअर टॅगचं नोटिफिकेशन मिळाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. ख्रिस्तोफरने ट्रॅकर कारच्या रिअर बंपरवर लावला होता. याच एअरच्या मदतीने पोलिसांनीही आरोपीचा माग काढल्याची माहिती समोर येत आहे. पकडला गेल्यानंतर ख्रिस्तोफरने ही केवळ एक थट्टा असल्याचं म्हटलं. पण नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपण आताही जुन्या प्रेयसीवर प्रेम करत असल्यानं तिला ट्रॅक करत असल्याचं त्यानं म्हटलं. त्याला अटक करून 9 आठवड्यांसाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका झाली. पण नंतर साक्षीदारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून त्याला पुन्हा अटक करण्यात आली. त्याला कोठडीत ठेवण्यात आलंय. VIDEO - स्कूटीच्या फ्रंट पार्टमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच फणा काढून उभा राहिला साप आणि... काय आहे नेमकं अ‍ॅपल एअर टॅग? अ‍ॅपल कंपनीनं मागील वर्षी एअर टॅग लाँच केलं होतं. हे एक प्रकारचे ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. एखाद्या डिव्हाइसला किंवा वस्तूला शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. एअर टॅगचा वापर फाइंड मायच्या (Find My) मदतीनं केला जातो. या द्वारे एअरटॅगचं शेवटचं आणि सध्याचं लोकेशन याची माहिती मिळते. दरम्यान, अ‍ॅपल कंपनीच्या उत्पादनांमध्ये असंख्य उपयोगी फीचर्स आहेत. या उत्पादनांमुळे आयुष्य खूप सुसह्य झालं आहे. एअरटॅगही त्यापैकी एक महत्त्वाचं डिव्हाइस आहे. पण याचा असा दुरुपयोग केल्या गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
First published:

Tags: Girlfriend, Shocking news

पुढील बातम्या