जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ज्या घरात केली चोरी तेथेच New Year Party, स्वयंपाकघर पाहून घरमालक हादरला!

ज्या घरात केली चोरी तेथेच New Year Party, स्वयंपाकघर पाहून घरमालक हादरला!

ज्या घरात केली चोरी तेथेच New Year Party, स्वयंपाकघर पाहून घरमालक हादरला!

या चोरांनी घरातील दारूची बाटलीदेखील संपवली. याशिवाय त्यांनी टीव्हीवर एक चित्रपटही पाहिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 3 डिसेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) छतरपुरमध्ये एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. नवीन वर्षानिमित्ताने पिकनिकसाठी गेलेल्या दाम्पत्याच्या रिकाम्या घरात चोर (Crime news) घुसले. दाम्पत्य बाहेर पिकनिक करीत होते. त्यावेळी चोर त्यांच्या घरी दारू पार्टी करीत होते. भूक लागल्यानंतर त्यांनी घरात मॅगी बनवली. जाता जाता कपाटातून सोनं, चांदी आणि कॅश लंपास केली. याशिवाय किचनमधून काजू, मनुके, बदामासह ड्रायफ्रूट्सदेखील घेऊन गेले. ही घटना छतरपूर शहरातील आहे. येथील सुरेंद्र लखेराच्या घरात चोर शिरले होते. सुरेंद्र नववर्षानिमित्ताने बहिणीच्या घरी पार्टी करण्यासाठी गेले होेते. रविवारी ते घरी परतले तर मुख्य दरवाज्याचं टाळं तुटलं होतं. आतमध्ये सामान अस्तव्यस्त झालं होतं. घराची परिस्थिती पाहून संपूर्ण घटना कळाली. त्यांनी तातडीने पोलिसांनी कॉल केला. घरात मॅगी खाल्लेल्या प्लेट्स आणि दारूच्या बाटल्या, ग्लास देखील होते. चोरांनी कपाट आणि मोठ्या बॉक्सचं टाळं तोडून कपडे बाहेर फेकले आणि सोनं-चांदी, कॅश घेऊन फरार झाले. हे ही वाचा- नववर्षानिमित्त काढलेला हा सेल्फी ठरला शेवटचा; अख्खं कुटुंब झालं उद्ध्वस्त चोरी करण्यापूर्वी केली पार्टी… नववर्षानिमित्ताने पिकनिकसाठी गेलेलं दाम्पत्य सुरेंद्र आणि रीना लखेरा यांनी सांगिकलं की, चोरी करण्यापूर्वी चोरांनी घरात पार्टी केली. त्यांनी घरातील सोनं-चांदी आणि कॅश घेऊन गेले. याशिवाय घरातील ड्रायफ्रूट्स आणि खाण्याचे पदार्थदेखील घेऊन गेले. जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा टीव्ही सुरू होता. घरात असलेली दारूची बाटलीदेखील संपली होती. दारू पित चोर टीव्ही पाहत पार्टी करीत होते. त्यांनी मॅगी करून खाल्ली. पोलिसांनी दारूच्या बाटलीवर चोरांचे फिंगर प्रिंट मिळाले आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात