भोपाळ, 2 जानेवारी : ग्वाल्हेरच्या घाटीगावात (Madhya Pradesh News) रविवारी भरधाव कार रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली. या कारमधील कुटुंबीय उज्जेनमधून महाकालचं दर्शन घेऊन परतत होतं. हे कुटुंबीय उत्तर प्रदेशातील मैनपूरी येथे राहणारं आहे. या अपघातात आजोबा-नातवासह तिघांचा मृत्यू (Road Accident) झाला आहे. तर आई-मुलगा जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी साधारण 6 वाजता घडला. रस्त्यावर धुकं असल्याकारणाने ड्रायव्हरला रस्त्याशेजारी उभा असलेला ट्रक दिसला नाही. क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यात आली. यात अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यात आलं. मात्र सर्वांचा मृत्यू झाला होता. या कारच्या मागे एक अन्य कारमध्ये मृतांचे कुटुंबीय व मित्र येत होते. अपघाताची माहिती त्यांनीच पोलिसांना दिली. मृतांमध्ये रोहितदेखील होता. त्याने सायंकाळी उज्जेनहून येताना सर्वांसह एक सेल्फी काढला होता. हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा सेल्फी ठरला. उत्तर प्रदेशातील हे कुटुंब दोन दिवसांपूर्वी कुटुंबीय व मित्रांसह नवीन वर्षे साजरा करण्यासाठी उज्जेन येथील महाकाल येथे आले होते. दर्शन केल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी शेजारच्या 22 वर्षीय रोहितने सर्वांसह सेल्फी घेतला. दोन कारमध्ये हे कुटुंबीय व मित्रपरिवार घरी परतत होते. रविवारी सकाळी घाटीगाव येथून जाताना त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये घुसली. रस्त्यावर दाट धुकं असल्याकारणाने चालकाला समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. हे ही वाचा-
जवळच्या मित्रानेच केला खून, पार्टी सुरू असताना खुपसला खंजीर
समोरच्या सीटवर रमेश चंद्र शर्मा (50), त्यांचा नातू सोहम शर्मा (08) आणि शेजारी रोहित गुप्ता (22) बसले होते. या तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. याच कारमध्ये मागे बसलेल्या दोघी जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कार ट्रकमध्ये घुसताच मोठा आवाज झाला. जखमी आरडाओरडा करू लागले. यानंतर जवळच्या हॉटेलमधून लोक बाहेर आले. आणि त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र जखमी आणि मृत व्यक्ती कारमध्ये अडकले होते. त्यांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.