मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /चोर तो चोर! पैसे नव्हते तर कुलूप लावलंच कशाला? हताश चोरट्यांचं घरमालकाला पत्र

चोर तो चोर! पैसे नव्हते तर कुलूप लावलंच कशाला? हताश चोरट्यांचं घरमालकाला पत्र

चोरट्यांनी कुलूप फोडून घरात प्रवेश केला, मात्र कॅश (Thieves leaves a letter for house owner) न सापडल्याने हताश झाल्यामुळे त्यांनी घरमालकाच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली.

चोरट्यांनी कुलूप फोडून घरात प्रवेश केला, मात्र कॅश (Thieves leaves a letter for house owner) न सापडल्याने हताश झाल्यामुळे त्यांनी घरमालकाच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली.

चोरट्यांनी कुलूप फोडून घरात प्रवेश केला, मात्र कॅश (Thieves leaves a letter for house owner) न सापडल्याने हताश झाल्यामुळे त्यांनी घरमालकाच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली.

भोपाळ, 11 ऑक्टोबर : चोरट्यांनी कुलूप फोडून घरात प्रवेश केला, मात्र कॅश (Thieves leaves a letter for house owner) न सापडल्याने हताश झाल्यामुळे त्यांनी घरमालकाच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली. ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर (Thief’s letter getting viral on social media) जोरदार व्हायरल होत आहे. कुणालाही हसू येईल अशी ही चिठ्ठी चोरट्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी ठेवली.

अशी झाली चोरी

मध्यप्रदेशच्या देवासचे उप जिल्हाधिकारी त्रिलोचन सिंह गौड यांच्या सरकारी निवासस्थानात चोरट्यांनी प्रवेश केला. सरकारी अधिकारी असल्यामुळे यांच्या घरात भरपूर माल असेल, अशी चोरट्यांची अपेक्षा होती. मात्र जेव्हा चोरट्यांनी मोठ्या कष्टानं कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी निराशाच झाली. त्यांच्या अपेक्षेच्या तुलनेत घरात फारच किरकोळ गोष्टी होत्या.

चोरट्यांचा झाला अपेक्षाभंग

मोठा अधिकारी, सरकारी निवासस्थान, मोठ्या लोकांमध्ये उठबस असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी आपल्याला लाखो रुपये सहज मिळतील, अशी अपेक्षा मनात धरून गेलेल्या या चोरट्यांना प्रत्यक्षात मात्र रोख रक्कम मिळालीच नाही. त्यांना काही वस्तू मिळाल्या, ज्यावर समाधान मानावं लागलं.

30 हजार रुपयांची चोरी

अंगठी, पैंजण आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी पकडून साधारण 30 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. जेव्हा उपजिल्हाधिकारी त्रिलोचन सिंह घऱात आले, तेव्हा घराचं कुलूप तोडल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी सावधपणे घरात प्रवेश करत परिस्थितीचा आढावा घेतला. घरात जाताच त्यांची पहिली नजर टेबलावर ठेवलेल्या पत्राकडं गेली. ते पत्र त्यांनी वाचलं. जर घरात पैसे नाहीत, तर कुलूप लावता कशाला, असा सवाल चोरट्यांनी त्या पत्रातून विचारला होता. ते पत्र वाचून चोरीच्या त्या गंभीर प्रसंगातही सर्वांना हसू फुटलं.

हे वाचा - जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरट्यांचा शोध  घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. लवकरच चोरट्यांना गजाआड करू, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Theft, Write a letter