जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / फिल्मी स्टाईल दरोडा; बाईकस्वारांनी 1 कोटी केले लंपास; ज्वेलर्स मात्र डोळे चोळतच राहिला

फिल्मी स्टाईल दरोडा; बाईकस्वारांनी 1 कोटी केले लंपास; ज्वेलर्स मात्र डोळे चोळतच राहिला

फिल्मी स्टाईल दरोडा; बाईकस्वारांनी 1 कोटी केले लंपास; ज्वेलर्स मात्र डोळे चोळतच राहिला

दिवसाढवळ्या फिल्मी स्टाइल चोऱ्या होणं ही बिहारमध्ये नवी गोष्ट नाही. हे मात्र भयंकरच आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

भागलपूर, 6 फेब्रुवारी : बिहार (Bihar) हे राज्य कायमच गुन्हेगारीच्या वाढत्या दरामुळे चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गुन्ह्यामुळे बिहार चर्चेत आलं आहे. भागलपूर (Bhagalpur) ही बिहारमधली स्मार्ट सिटी (smart city). इथं हे प्रकरण घडलं. बाईकवर (bike) बसून आलेल्या चार बदमाशांनी सोन्याची (gold) मोठी लूट (looted) केली आहे. तब्बल एक कोटी (1 crore) रुपयांचं हे सोनं असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूरमधल्या एका मोठ्या ज्वेलरी दुकानाचे एजंट अभिषेक कुमार हे कलकत्त्याहून (Kolkata) दागिने (jewellery) घेऊन परतत होते. त्यांच्यासोबत बाबू साहेब सिंह हेदेखील होते. शनिवारी सकाळी दोघं सुपर एक्स्प्रेसमधून उतरले. दोघे स्कुटीवरून शहरातील विशाल स्वर्णिका ज्वेलर्सला जात होते. रस्त्यात हे बाईकवर असलेले चार बदमाश आडवे आले. दोघांना काही कळण्याच्या आतच बाईकवरील बदमाशांनी दोघांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. उरलेल्या दोघांनी अभिषेक यांच्या हातातील बॅग (bag) हिसकावली. क्षणात चौघेही त्याच बाईकवर बॅग घेऊन फरार झाले. हे ही वाचा- कोरोना लसीकरणानंतर 1800 आरोग्य कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठांकडून तपास सुरू अभिषेक यांनी लुटीची माहिती विशाल स्वर्णिका ज्वेलर्सचे मालक विशाल यांना फोनवरून दिली. विशाल यांनी लगोलग पोलिसांना कळवलं. एसएसपी निताशा यांनी अभिषेक आणि बाबू या दोघांकडे चौकशी केली. त्यातून समोर आलं, की या बॅगमध्ये तब्बल 1 किलो 850 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. याची किंमत 1 कोटीच्या आसपास होती. चोरीची robbery) केस दाखल करून घेतल्यावर पोलीस आता पुढील तपासात गुंतले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , gold , Robbery
  • First Published :
जाहिरात
जाहिरात