एका ‘फोन कॉल’मुळे गुंडांची टोळी जेरबंद, देहूरोडमध्ये दिवसा ढवळ्या लुटायची कापडांची दुकानं

काही अंतर पाठलाग करून पाचही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भर बाजारपेठेत घडलेल्या थरारक गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांच्या दोन पथकांनी कामगिरी बजावली.

काही अंतर पाठलाग करून पाचही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भर बाजारपेठेत घडलेल्या थरारक गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांच्या दोन पथकांनी कामगिरी बजावली.

  • Share this:
अनिस शेख, देहूरोड 03 नोव्हेंबर: देहूरोड शहरातील (Dehu road City) ऐतिहासिक बाजारपेठेत धमकी देत चोरी करणाऱ्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी (Police) अखेर जेरबंद केलं आहे. गेले दोन दिवस या टोळीने रेडीमेट कापडाच्या दुकानात धाक दाखवत तसेच जीवे मारण्याची धमकी देत 25 हजार रुपयांच्या कपड्याची चोरी केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी जणांच्या टोळीला क्राईम ब्रांचच्या युनिट 5 च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांना आलेल्या एका फोन कॉलमुळे आणि पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने दिवसा ढवळ्या कपड्यांची दुकाने लुटणारी ही टोळी जेरबंद झाली आहे. सतत होणाऱ्या गुंडांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवणार असल्याच्या निर्णयाने खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरून गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली आहे. शेऱ्या उर्फ ऋषिकेश आडागळे, विजय पिल्ले, अल्बर्ट जोसेफ, आतिष शिंदे, राहुल टाक, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली  दिली आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या थरारक गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दोन पथके तयार केली होती. आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या. ‘स्टंटबाज’ निघाला धोकेबाज, युट्यूबरनेच प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याचं उघड त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती.  त्या एका फोन कॉलमुळे पोलिसांना आरोपी हे निगडी ओटा स्कीम येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अधिकारी राम गोमारे यांच्यासह कर्मचारी, धनराज किरणाळे ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे संदीप ठाकरे यांना पाहून आरोपींनी पळ काढला. पश्चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड, कऱ्हाडात कट्टर विरोधक येणार एकत्र परंतु काही अंतर पाठलाग करून पाचही आरोपींना  पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव न्यायालयात आरोपींना हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एसीपी संजय नाईक पाटील यांनी पोलिसांना शहरातील प्रमुख भागात तसेच मुख्य बाजारपेठेत गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देहूरोड शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या भागांवर आता पोलिसांची  करडी नजर असणार आहे त्यामुळेच गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा असंही पोलिसांच म्हणणं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: