Home /News /crime /

Mobile Game : मोबाईलमधील गेम बनलं मृत्यूचे कारण, भावाने फोन हिसकावला बहीणीने उचलले थेट टोकाचे पाऊल

Mobile Game : मोबाईलमधील गेम बनलं मृत्यूचे कारण, भावाने फोन हिसकावला बहीणीने उचलले थेट टोकाचे पाऊल

मोबाईल गेममुळे (MOBILE GAME) सध्या लहान मुलांच्या जिवाला धोका पोहोचण्याच्या बऱ्याच घटना समोर येत आहेत.

  लखनौ, 17 जून : मोबाईल गेममुळे (MOBILE GAME) सध्या लहान मुलांच्या जिवाला धोका पोहोचण्याच्या बऱ्याच घटना समोर येत आहेत. दरम्यान मोबाईलवर गेम खेळण्याच्या (child addicted mobile game) व्यसनाने काल (दि. 16) एका मुलीचा जीव गेल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या अटारा येथे घडली. गेम खेळत असलेल्या बहीणीकडून भावाने मोबाईल (mobile) हिसकावून घेतला. दरम्यान ती मुलगी चौथीच्या वर्गात सध्या शिकत आहे. तिने रागाच्या भरात साडीने बांधलेल्या पाळण्यालाच गळफास लावून घेत आत्महत्या केली. (suicide) या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

  उत्तर प्रदेशच्या अटारा पोलीस (uttar pradesh atara police station) ठाण्याच्या हद्दीतील सिव्हिल लाईन्स येथे राहणारा चालक पूरण वर्मा याला पाच मुले आहेत. सर्वात लहान नऊ वर्षांची मुलगी लक्ष्मी मोबाईलवर गेम खेळत होती. त्याचा मोठा भाऊ १२ वर्षीय राणू हा गेम खेळण्यासाठी तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेत होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. शेवटी राणूने मोबाईल हिसकावून घेतला आणि स्वतः गेम खेळू लागला. यामुळे लक्ष्मीला याचा राग आल्याने ती तीच्या खोलीत गेली. राणू तिथेच मोबाईलवर गेम खेळत बसल्याने बहीण आत काय करत होती हे त्याला समजत नव्हते.

  हे ही वाचा : भंडाऱ्यात कुलरने घेतला तरुणीचा जीव; घरातील फरशी साफ करताना जागीच मृत्यू

  दरम्यान काही वेळाने जेवण बनवणारी मोठी बहीण निशा खोलीत पोहोचली आणि लक्ष्मी फासावर लटकल्याचे आढळले. हे बघून मोठी निशाने जोराने ओरडली. दरम्यान घरातील सगळेच जोरात रडू लागले. रडण्याच्या आवाजाने परिसरातील लोक पोहोचले. दरम्यान लटकलेल्या अवस्थेत असलेल्या लक्ष्मीला खाली उतरवून सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

  मोठी बहीण निशा म्हणाली की, लक्ष्मी ही प्राथमिक शाळेतील चौथीत शिकणारी होतकरू विद्यार्थिनी होती. घटनेच्या वेळी आई कलावती या बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. वडील ड्रायव्हर आहेत. ते बाहेर काम करत होते. या दरम्यान भाऊ बहीणीचे भांडण होऊन हा प्रकार घडल्याचे ती म्हणाली.

  हे ही वाचा : वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकाची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO आला समोर

  दोन दिवसांपूर्वी आईचे कपडे शिवले होते

  मृत लक्ष्मीचे वडिल म्हणाले की, लक्ष्मी सगळ्या भावंडांमध्ये खूप हुशार मुलगी होती. दरम्यान आमचा मोठा मुलगा बाहेर राहतो. तो नुकताच पत्नीला घेऊन आला होता. लक्ष्मीने तिच्या वहिनीकडून शिवणकाम शिकले. दोन दिवसांपूर्वी तीने आपल्या आईला कपडे शिवले होते हीच तिची शेवटची आठवण राहिली आहे.

  साडीच्या साहाय्याने आत्महत्या

  आई पूरण वर्मा म्हणाल्या की, मोठी मुलगी नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी घरी आली आहे. तिच्या लहान मुलासाठी घरात साडीचा झुला लावला आहे. लक्ष्मीने त्याच साडीच्या झुल्याला फास लावून घेतला. घटनेच्या वेळी विवाहित मोठी मुलगी, मुलगा रानू आणि १५ वर्षीय शैलेंद्र घरात असल्याचे त्यांनी सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Mobile, Mobile app, Mobile Phone, Suicide, Suicide news

  पुढील बातम्या