नवी मुंबई, 15 जुलै, प्रमोद पाटील : सध्या राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. टोमॅटोचे दर दीडशे रुपयांच्या पार पोहोचले आहेत. टोमॅटो खरेदी करणं परवडत नसल्यानं सर्वसामान्यांच्या आहारातून टोमॅटो गायब झाले आहेत. मात्र दुसरीकडे टोमॅटोचे दर वाढल्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना देखील घडत आहेत. अशीच एक घटना आता नवी मुंबईतून समोर आली आहे. चोर टोमॅटोची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, टोमॅटो चोरीचा हा प्रकार नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमधून समोर आला आहे. बाजार समितीतून टोमॅटो चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात टोमॅटोचा दर किलोला दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. आरोपींचा शोध सुरू चोरीचा हा प्रकार तेथील व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.