मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून कोर्टातच जबरी चोरी, म्हणे शिक्षेचा घेतला बदला!

जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून कोर्टातच जबरी चोरी, म्हणे शिक्षेचा घेतला बदला!

कोर्टाने आपल्याला शिक्षा दिली, तर आपणही कोर्टाचा बदला घ्यायचा असा विचार एका चोरट्याने केला. काही दिवसांनी जामिनावर सुटल्यावर त्याने थेट कोर्टातच चोरी केली.

  • Published by:  desk news
अजमेर, 24 डिसेंबर: कोर्टाने शिक्षा दिल्यामुळे (Punishment by court) नाराज असलेल्या आरोपीने (angry criminal) कोर्टातच चोरी (Theft) करून बदला (Revenge) घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टाने आपल्याला सुनावलेली शिक्षा अयोग्य असून कोर्टालाच धडा शिकवण्याची गरज आहे, असा विचार या आरोपीने केला. अनेकदा आरोपींना त्यांच्या चुकांमुळे आणि गुन्ह्यांमुळे शिक्षा होत असल्याचं लक्षात येत नाही. त्यासाठी ते कधी कायद्यांना, कधी न्यायालयांना तर कधी यंत्रणेला जबाबदार ठरवत असतात. मात्र आपली स्वतःची काही चूक असू शकेल, याची त्यांना जाणीवही नसते. कोर्टाच्या चुकीमुळेच आपल्याला शिक्षा मिळाली, या मतावऱ ठाम असणाऱ्या एका आरोपीने कोर्टाचा बदला घेण्यासाठी तिथेच चोरी करण्याचा निर्णय घेतला. असा आखला डाव भगीरथ नावाच्या आरोपीची काही दिवसांपूर्वी कोर्टात तारीख होती. मात्र काही कारणांनी तो त्यावेळी कोर्टात आलाच नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कोर्टाने सर्व साक्षीपुरावे तपासून आणि प्रकरणाचा विचार करून भगीरथला तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्यानंतर तुरुंगात गेलेल्या भगीरथने कोर्टालाच धडा शिकवण्याचा निर्णय़ घेतला. आपली काहीच चूक नसताना कोर्टाने दिलेली शिक्षा अन्याय्य असल्याचा त्याचा दावा होता. जामिनावर केली चोरी आरोपीने लवकरच जामीन मिळवला आणि तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर आपला साथीदार गजेंद्रसोबत त्याने कोर्टाच्या आवरात जबरी चोरी केली. यामध्ये एलसीडी, प्रिंटर, टीव्हीचं साहित्य यासह अनेक गोष्टींची चोरी केली. यातील काही साहित्य त्याने स्वतःच्या वापरासाठी ठेवलं तर काही साहित्य भंगारवाल्याला विकून त्याचे पैसे घेतले. हे वाचा - आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल पोलिसांनी लावला धडा कोर्टात चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याचा तपास घ्यायला सुरुवात केली. सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भगीरथनेच ही चोरी केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी भगीरथ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published:

Tags: Court, Crime, Theft

पुढील बातम्या