मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मॉलमध्ये सेल्फी घेत होता तरुण; दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने जागीच मृत्यू

मॉलमध्ये सेल्फी घेत होता तरुण; दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने जागीच मृत्यू

हा तरुण सेल्फी घेत होता, त्यात तोल सुटल्याने तो खाली उभ्या असलेल्या एका तरुणीवर पडला.

हा तरुण सेल्फी घेत होता, त्यात तोल सुटल्याने तो खाली उभ्या असलेल्या एका तरुणीवर पडला.

हा तरुण सेल्फी घेत होता, त्यात तोल सुटल्याने तो खाली उभ्या असलेल्या एका तरुणीवर पडला.

जयपूर, 25 डिसेंबर : जयपुरमध्ये (Jaipur News) ट्राइटन मॉलमध्ये एका तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा तरुण ग्राउंड फ्लोअर उभ्या असलेल्या तरुणीवर पडला. या दुर्घटनेत तरुणीही जखमी झाली आहे. दोघांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. सूचना मिळताच झोटवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. आज ख्रिसमसनिमित्ताने ठिकाठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जयपूरमधील ट्रायटन मॉलमध्येही ख्रिसमसनिमित्ताने आनंदाचं वातावरण होतं. ठिकाठिकाणी लाल रंगाची फुगे लावण्यात आलं होतं. सर्वत्र आनंदाचा वातावरण होतं. अशात दुसऱ्या मजल्यावर एक तरुण सेल्फी घेत असताना त्याचा तोल सुटला आणि तो खाली कोसळला.

पोलिसांच्या तपासानुसार तरुण मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर सेल्फी घेत होता. यादरम्यान तरुणाचं संतुलन बिघडलं आणि ते ग्राऊंड फ्लोअरवर उभ्या असलेल्या तरुणीवर पडला. तरुणीची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा-VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई

तरुणाचा मृतदेह कांवटिया रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना याबाबत सूचना दिली आहे. या दुर्घटनेबाबत कळताच पोलीस अधिकारीही घटनास्थशी पोहोचले. पोलीस या संपूर्ण प्रकरणात तपास करीत आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Jaipur