मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नसबंदीच्या ऑपरेशनदरम्यान घडला धक्कादायक प्रकार; महिलेच्या नातेवाईकांचा रुग्णालयातच गोंधळ

नसबंदीच्या ऑपरेशनदरम्यान घडला धक्कादायक प्रकार; महिलेच्या नातेवाईकांचा रुग्णालयातच गोंधळ

त्या दिवशी या रुग्णालयात एकूण 18 महिलांच्या नसबंदीचं ऑपरेशन करण्यात आलं होतं

त्या दिवशी या रुग्णालयात एकूण 18 महिलांच्या नसबंदीचं ऑपरेशन करण्यात आलं होतं

त्या दिवशी या रुग्णालयात एकूण 18 महिलांच्या नसबंदीचं ऑपरेशन करण्यात आलं होतं

  • Published by:  Meenal Gangurde

मुंगेर, 31 जानेवारी : बिहारमधील एका सरकारी रुग्णालयात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आज एक महिला जीवन-मरणाशी लढत आहे. मुंगेर येथील (Munger) एका महिलेची नसबंदी करताना (Sterilization) भयावह प्रकार घडला. महिला ऑपरेशनसाठी (Operation) गेली असता डॉक्टरांनी निष्काळजीपणे महिलेच्या आतड्या कापल्या. यानंतर महिलेला तातडीने भागलपुरमध्ये पाठविण्यात आलं आहे. या घटनेनंतर महिलाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या महिला वॉर्डात मध्यरात्री गोंधळ घातला. याशिवाय रुग्णालयाचे प्रमुख आणि ऑपरेशन करणाऱ्या महिला डॉक्टरवर निष्काळजीपणा करण्याचा आरोप लावला.

या रुग्णालयात शुक्रवारी एकूण 18 महिलांच्या नसबंदीचं ऑपरेशन करण्यात आलं. ( sterilization operation) ज्यामधील लालदरबाजा येथे राहणारे कुमार पासवान यांची पत्नी प्रगती देवीदेखील नसबंदीचं ऑपरेशन करण्यासाठी आली होती. डॉक्टर निर्मला गुप्ता यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रगतीची त्वचा जाड असल्याकारणाने स्टीच करायला अडचण येत होती. थोड्या वेळानंतर सांगण्यात आलं की ऑपरेशन दरम्यान प्रगतीच्या आतड्या कापल्या गेल्या, ज्यानंतर स्टीच करुन नीट करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-मुलाने केली आईची निर्दयी हत्या; अंगणात मृतदेह जाळून त्यावर कोंबडी भाजून खाल्ली

ऑपरेशननंतर प्रगतीला वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान रात्री 8.30 वाजता एका नर्सने सांगितलं की, ऑपरेशनदरम्यान चुकून प्रगतीची आतडी कापली गेली आहे. तिला पुढील चांगले उपचार मिळावे यासाठी भागलपूर हलवावे लागेल. याची सूचना मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या परिसरात गोंधड घातला. महिलेचे कुटुंबीय विक्की कुमार याने सांगितलं की, ऑपरेसनंतर प्रगतीला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मात्र यानंतर तिला कोणतेही डॉक्टर पाहायला आले नाही, की कोणत्याही अधिकाऱ्याने चौकशी केली नाही. रुग्णालयाचे उपाध्यक्ष रामप्रीत सिंह यांनी सांगितलं की, ऑपरेशनदरम्यान काही प्रकरणात अडचणी येऊ शकतात. प्रगतीच्या केसमध्येही अशा प्रकारची अडचण आल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं.

First published:

Tags: Bihar