इंदूर, 10 जानेवारी : देशात ड्रग्जचं जाळ वाढत आहे, हे गेल्या अनेक दिवसांमध्ये आलेल्या बातम्यांवरुन स्पष्ट होत आहे. तरुणांना अडकवण्याचा या मोठ्या लोकांचा प्रयत्न आहे. इंदूरमध्ये ड्रग माफियांविरोधात कारवाई सुरू आहे. याअंतर्गत आज नगर निगम, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या टीमने अवैध कारवाई सुरू असलेल्या स्वीटहार्ट हॉटेलला उद्ध्वस्त केलं आहे. पीपल्याहाना चौकात उभी असलेल्या तीन मजली हॉटेलच्या बेसमेंटमध्येही अवैध बांधकाम करण्यात आलं होतं. कारवाईदरम्यान हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक साहित्य सापडले आहे. महालक्ष्मी नगरमध्ये कारवाई केल्यानंतर कलेक्टर मनिष सिंह यांच्या निर्देशानुसार पीपल्याहाना चौकात उभं असलेलं हॉटेल पाडण्याची कारवाई सुरू केली. निगम उपायुक्त लता अग्रवाल यांनी सांगितलं की, हे संपूर्ण हॉटेल अवैध (sex rackets) आहे. हे हॉटेल मोहम्मद अली उस्मानी यांचं आहे. यावर न केवळ मध्य प्रदेश तर दुसऱ्या राज्यातील अनेक गुन्हेगारीची प्रकरण दाखल करण्यात आली आहे. अनेक तक्रारींनंतर आरोपी तुरुंगात 900 वर्गफूट जमिनीवर बांधण्यात आलेल्या त्या अवैध्य हॉटेलच्या बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर आणि वरील तीन मजल्यांवर बेकायदेशीर कृत्य सुरू होतं. बऱ्याच काळापासून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हॉटेलमधील वेश्याव्यवसायाबरोबरच ड्रग्ज सप्लायच्या तक्रारी मिळाल्या होत्या. हॉटेलचे संचालक मोहम्मद अली उस्मानी याच्याविरोधात कलेक्टर मनीष सिंह आणि डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश दिले आहे. आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठविण्यात येईल. नगर नियमचे अप्पर उपायुक्त यांनी सांगितलं की, मोहम्मद उस्मानी तिलग नगर ठाणे हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने आपल्या हॉटेलमध्ये तरुणांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करीत होता. सर्व प्रकारची नशा आणि इतर व्यसनं इथं उपलब्ध होते. या हॉटेलमध्ये अवैध प्रकार सुरू होता. त्यामुळे अखेर त्याला जमिनदोस्त करण्यात आलं. हे ही वाचा- हल्ला करणाऱ्या सिंहाला श्वानानं पळव, पळव पळवलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत या आरोपींवर कारवाई केली आहे. जमीन माफिया हेमंत यादव यांच्यावर सेंट्रल पोलीस स्टेशन आणि विजय नगर पोलिसांनी अतिक्रमण आणि फसवणुकीचे दोन केस दाखल केले आहेत. गँगस्टर सतीश याच्यावर पोलिसांनी धमकावणे, फ्लॅटवर अतिक्रमण करण्याची केस दाखल केली आहे. तुकोगंज पोलिसांनी चिराग शाह आणि बिल्डर ए मेहता यांच्याविरोधात फ्लॅट्सची हेराफेरी करण्याची केस दाखल केली आहे. शिवनारायण अग्रवाल याच्याविरोधात पोलिसांनी तुलसी नगर कॉलनीमधील फ्लॅट्सबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







