बाजीगर! हल्ला करणाऱ्या सिंहाला श्वानानं पळव, पळव पळवलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO
वाघाला अनेकदा श्वानानं पळवून लावल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण श्वानानं तर जंगलाच्या राजाला देखील झुकवल्याचा हा दुर्मीळ व्हिडीओ तुम्ही पाहिला का? IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
गिर सोमनाथ, 10 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा शक्तीशाली असलेल्या प्राण्यांनी हल्ला केल्यावर लहान प्राणी आत्मविश्वास आणि इच्छा शक्तीच्या जोरावर तो हल्ला परतवून लावतो. असे काही व्हिडीओ देखील नव्या वर्षात आपल्या समोर आले होते. आता श्वान आणि सिंहाच्या लढाईचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सिंह श्वानाचा पाठलाग करत आहे. त्याच्यावर हल्ला करू पाहात असताना श्वान त्याच्यावर जोरात भुंकतो. आत्मविश्वास आणि पूर्ण ताकदीनं श्वान जोरात सिंहाच्या अंगावर धावून जातो. हे पाहून सिंह देखील दोन पावलं मागे सरकतो. श्वान आपल्या मार्गानं जायला निघणार तोच पुन्हा एकदा जोरात त्याच्या अंगावर भुंकतो आणि इशारा देऊन निघून जातो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाघाला अनेकदा श्वानानं पळवून लावल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण श्वानानं तर जंगलाच्या राजाला देखील झुकवल्याचा हा दुर्मीळ व्हिडीओ तुम्ही पाहिला का? IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
जंगल सफारी करणाऱ्यासाठी आलेल्या पर्यटकांना हा अद्भूत अनुभव घेता आला. श्वानानं मोठ्या आत्मविश्वासानं जंगलाच्या राजालाही हुसकावून लावलं. श्वास रोखायला लावणाऱ्या या दुर्मीळ लढाईचा व्हिडीओला देखील सोशल मीडियावर अनेक युझर्सनी खूप लाईक्स दिल्या आहे. हा व्हिडीओ गिर सोमनाथ इथल्या अभयारण्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.