रांची, 14 ऑक्टोबर : रांचीतील तमाड पोलीस ठाण्यात नवरात्रौत्सवादरम्यान (Navratra) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरात्रात एका व्यक्तीने नरबळी दिल्याचं (Human Sacrifice) समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीजवळ एक चाकूदेखील सापडला आहे. घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय व्यक्तीचा नरबळी देण्यात आला आहे. या प्रकरणाची सूचना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी महानवमी सकाळी बळी चढविण्यासाठी एका व्यक्तीचा शोध घेत होता.
रांचीच्या तमाडमध्ये नरबळीची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच गावातील करूण महतो याने ही हत्या केली आहे. (The search had been going on since morning to sacrifice on Navami, The brutal murder of a 35 year old man)
हे ही वाचा-गाडीला कट मारल्याने वाद, मारहाणीत पुण्यातील दुचाकीस्वाराचा तडफडून मृत्यू
या प्रकरणाबद्दल सांगताना रांची ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितलं की, करूण महतो सकाळपासून नरबळीदेण्याची तयारी करीत होता. आणि त्याने ठरवल्यानुसार एका व्यक्तीची हत्या केली. व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करूण महतो आधी जंगलाच्या दिशेने गेला. येथे हरादंग लोहरा लाकूड कापत होता. करूणने हरादंगकडे लाकडापासून एक शस्त्र तयार करून मागितलं. आणि त्याच शस्त्राने त्याच्यावर वार केले.
त्याच्यावर वार केल्यानंतर करूण महतो त्याला तेथेच सोडून फरार झाला. त्यानंतर व्यक्तीला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. गावातील एसपींनी सांगितलं की, सुरुवातीच्या तपासात नरूबळीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. आरोपीचा चौकशी सुरू आहे. त्याशिवाय आरोपी मानसिक रुग्ण असल्याचंही समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Ranchi