हरयाणा, 10 डिसेंबर : हरयाणातील (Haryana News) जिंदमधील सापडलेल्या नगूरा भागात एक मानवी सांगाडा सापडल्याचं गूढ समोर आलं आहे. हा मानवी सांगाडा रीना नावाच्या एका महिलेचं आहे. काही दिवसांपूर्वी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र रीना बेपत्ता नव्हती तर सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी तिच्या हत्या करून कचऱ्यावर मृतदेह ठेवून त्याला आग लागल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रीनाची सासरची मंडळी तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सायकलवरुन घेऊन जात असताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे ही वाचा- Nagpur:आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला अंत 7 डिसेंबर रोजी रस्त्यावर मानवी सांगाडा सापडला होता. हा सांगाडा रीनाचा होता. सासरच्या मंडळींनी रीनाची जाळून हत्या केली आणि यानंतर तिचा सांगाडा झाडांमध्ये फेकून दिला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हायरल फुटेजमध्ये रीनाचे सासरे सायकलवरुन मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. तर पुढे रीनाचा पतीही दिसत आहे. रीना (27) चा विवाह 10 वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी जेव्हा तक्रार केली तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की, रीना 50 हजार रुपये घेऊन पळून गेली होती. मात्र सत्य काहीतरी वेगळं होतं, यामुळे पोलिसांनी तपास कायम ठेवला. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रीनाच्या सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे. अद्याप रीनाची हत्या करण्यामागील कारण समोर आलेलं नाही. तर पोलिसांकडून रीनाच्या पतीसह सासरच्या मंडळींची चौकशी केली जात आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.