जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बाबांशी मोबाइलवर बोलताना मॉडेलने हॉटेलच्या गच्चीवरुन मारली उडी; झाली भयंकर अवस्था

बाबांशी मोबाइलवर बोलताना मॉडेलने हॉटेलच्या गच्चीवरुन मारली उडी; झाली भयंकर अवस्था

बाबांशी मोबाइलवर बोलताना मॉडेलने हॉटेलच्या गच्चीवरुन मारली उडी; झाली भयंकर अवस्था

बाबा फोनवर समजावत राहिले, मात्र मुलीने त्यांचं शेवटपर्यंत ऐकलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 31 जानेवारी: राजस्थानमधील (Rajasthan News) जोधपुरमध्ये (Suicide Attempt in Jodhpur Hotel) हॉटेलच्या गच्चीवरुन उडी मारणारी फॅश मॉडेलवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. 18 वर्षांच्या गुनगुनला रुग्णालयात पाहून बापाचं काळीज पिळवटून निघालं आहे. ‘मुली, असं करू नको, हे किती वेळा सांगितलं होतं. तू असं का केलंस’ वारंवार असं म्हणत गुनगुनचे वडील रडत आहेत. तपासामध्ये समोर आलेल्या वृत्तानुसार, गुनगुनने याआधी आपल्या वडिलांना आत्महत्येबद्दल सांगितलं होतं. रविवारी सायंकाळी उदयपूरहून शूट पूर्ण केल्यानंतर गुनगुन घरी गेली नाही. स्टेशनवरुन ती सरळ हॉटेलात आली. घटनेच्या वेळी वडील तिच्यासोबत फोनवरुन बोलत होते. वडील तिला आणण्यासाठी स्टेशनवरही गेले होते. मात्र गुनगुन त्यांच्यासोबत न जाता थेट हॉटेलला आली. वडील हॉटेलात पोहोचली त्या आधीच तिने गच्चीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. 18 वर्षांची गुनगुन उपाध्याय हिने रविवारी सायंकाळी हॉटेल लॉर्डसच्या गच्चीवरुन उडी नारली. ती हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर पडल्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र तिच्या शरीरात काचा शिरल्या आहेत. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला मथुरा दास माथूर रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रिब्समध्ये फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे. फीमर बोनदेखील फ्रॅक्चर आहे. गुनगुनचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुनगुनच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिला एक भाऊदेखील आहे. गुनगुनचं तिच्या आईवर खूप प्रेम होतं. गुनगुनचे तिच्या मावशीसोबत चांगले संबंध आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ब्लड इन्फेक्शनमुळे ती आजारी होती. यामुळे देखील ती खूप तणावात होती. गुनगुन 16 व्या वर्षीय मॉडलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली होती. तेव्हा ती 11 वीत शिकत होती. तिने खूप फोटो फॅशन शूट केले होते. गुनगुनच्या वडिलांचं बाजारात ड्रायफ्रूट्सचा बिजनेस आहे. त्यांनी गुनगुनच्या नावानेच हा ब्रँड लाँन्च केला होता.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात