Home /News /crime /

भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अघटित घडलं; दोन सख्ख्या बहिणींची कोयत्याने क्रूरपणे केली हत्या

भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अघटित घडलं; दोन सख्ख्या बहिणींची कोयत्याने क्रूरपणे केली हत्या

या दोघी बहिणींची अत्यंत क्रुरपणे कोयत्याने वारंवार वार करून हत्या करण्यात आली

    म्हापसा, 16 नोव्हेंबर  : मालमत्ता आणि घरगुती वादातून दोन सख्खा बहिणींची भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही घटना बार्देश तालुक्यातील इग्रजवाडो मार्ना शिवोली येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन संशसितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा 9.30 च्या सुमारात घडला. मार्ता लोबो (64) आणि वीरा लोबो (62) असे मृत महिलांची नावे आहेत. या प्रकरणात रोविना लोबो (29) आणि सुबहान राजाबली (20) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित रोविना लोबो हिचं लग्न 10 वर्षांपूर्वी ज्युलिओ रोबो याच्यासोबत झाले होते. ते दोघेही मार्ता आणि वीरा (ज्युलिओची आत्या) एकाच घरात राहत होते. यावेळी रोविनाचे मार्ता आणि वीरासोबत खटके उडायचेय. याशिवाय संपतीवरुनही त्यांच्यामध्ये वाद होत होता. त्यामुळे रोविनाने त्या दोघांना मारण्याचं ठरवलं. त्यासाठी रोविनाने एका सुपारी घेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान तिची भेट सुबान राजबाली या मजुराशी झाली. पैशांसाठी राजाबली याने दुहेरी खुनाचा भागीदार होण्याची तयारी दाखवली. त्यानुसार या दोन बहिणींच्या हत्याचा प्लान तयार केला. रविवारी सायंकाळी या दोघींनी मिळून दोन्ही बहिणींचा कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार केले. व त्यांचा खून केला. हत्येच्या तासाभरातच संशयित रोविना आणि राजाबली यांना आसगाव येथून पकडण्यात आले आहे. त्यानंतर दोघांनी पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे ही वाचा-देवाच्या मूर्तीसमोर माजी आमदारांनी सोडले प्राण; CCTV मध्ये कैद झाली घटना कसा रचला प्लान रविवारी हत्या करण्याच्या इराद्याने रोविनाने राजाबली याला घराच्या मागील बाजूला सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या एका खोलीत लपवून ठेवले होते. रात्री साधारण 9 च्या सुमारात तिने घराचे दिवे बंद केले आणि झोपण्याचं नाटक केलं. दिवे बंद झाल्याने खोलीतून मार्ता बाहेर आली असता रोविनाने तिच्यावर कोयत्याने वार केले. तशाच प्रकारे रोविना आणि राजाबली यांनी मिळून वीरालाही मारले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Diwali 2020, Murder

    पुढील बातम्या