मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हिऱ्यांची अंगठी नाही तर लग्नही नाही; नवरीला मारहाण करीत नवरदेवासह वऱ्हाडी फरार!

हिऱ्यांची अंगठी नाही तर लग्नही नाही; नवरीला मारहाण करीत नवरदेवासह वऱ्हाडी फरार!

नवरीला केस धरून मारहाण करण्यात आली.

नवरीला केस धरून मारहाण करण्यात आली.

नवरीला केस धरून मारहाण करण्यात आली.

  • Published by:  Meenal Gangurde

पंजाब, 5 सप्टेंबर : जालंधरमधील रामा मंडीमधील एका हॉटेलमध्ये साखरपुड्यादरम्यान गोंधळ उडाल्याचं वृत्त समोर आलं आहे. साखरपुड्याला हिऱ्याची अंगठी न मिळाल्याने नवरदेवाकडील मंडळींनी भांडण सुरू केलं. कालांतराने वाद इतका वाढला की, नवरदेवाकडील मंडळींनी मुलीला मारहाण केेली. त्यांनी मुलीचे केस ओढले, तिला मारलं आणि तेथून फरार झाले.

या सर्व प्रकारानंतर मुलीकडील मंडळींनी साखरपुड्यावर केलेल्या आयोजनावर पाणी फिरलं. आता या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीकडील मंडळींचा जबाब नोंदविला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा साखरपुडा ठरला तेव्हा अशी कोणतीच मागणी केली नव्हती. रविवारी साखरपुडा ठेवला होता. जेव्हा अंगठी घालण्याची वेळ आली तेव्हा मुलांच्या मंडळींनी सांगितलं की, त्यांना डायमंड रिंग हवीये. एक रिंग मुलगा आणि दुसरी त्याच्या भावाला द्यावी लागेल. मुलाच्या वहिणीसाठी सोन्याचा कडा आणि सासूसाठी भेटवस्तू मागू लागले. मुलीकडील मंडळींनी सांगितलं की, यापूर्वी अशी मागणी केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये गोंधळ झाला.

हे ही वाचा-चोरीसाठी विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलात चैन; चौकशीदरम्यान पोलिसही हैराण

यानंतर मध्यस्थाला बोलावण्यात आलं. यादरम्यान मध्यस्थानं आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. हे मुलाचं दुसरं लग्न असल्याचंही त्याने उघड केलं. ज्यांच्याबरोबर त्याला दोन मुले देखील आहेत. जेव्हा कुटुंबाने विरोध केला की त्यांची मुलगी अजूनही कुमारिका आहे, तेव्हा भांडण पुन्हा वाढले. त्यानंतर मुलांनी मुलीला केसांनी पकडून मारहाण केली. या घटनेत मुलीला मार लागल्याचंही समोर आलं आहे. मुलीचे कुटुंबीय जमा झाल्यावर आरोपी तेथून पळून गेले.

घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हिऱ्याच्या अंगठ्या आणि दागिने न मिळाल्याने संबंध तुटल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय मुलीला मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.

First published:

Tags: Crime news, Marriage