जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / विवाहबाह्य संबंधामुळे भाजपमधील करिअरचाच The End; पक्षाने त्या Video नंतर घेतला मोठा निर्णय

विवाहबाह्य संबंधामुळे भाजपमधील करिअरचाच The End; पक्षाने त्या Video नंतर घेतला मोठा निर्णय

विवाहबाह्य संबंधामुळे भाजपमधील करिअरचाच The End; पक्षाने त्या Video नंतर घेतला मोठा निर्णय

भाजपमधील महिला नेत्यालाही याचा फटका बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    लखनऊ, 22 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कारमध्ये प्रेयसीसोबत रोमान्स करीत असताना पकडण्यात आलेले भाजप नेता मोहित सोनकरला त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला होता. यानंतर पार्टीने मोठी कारवाई केली आहे. तर दुसरीकडे बुंदलखंडचे क्षेत्रीय अध्यक्ष मानवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, मोहितने एक महिन्यापूर्वीच पक्षातून राजीनामा दिला होता. शनिवारी रात्री उशिरा भाजप नेता मोहीत सोनकरला त्याच्या पत्नीने भाजपच्या महिला नेत्यासोबत कारमध्ये रोमान्स करीत असताना रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याची चपलेने मारहाण केली होती. पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकली पत्नी, भाजप नेत्याची रस्त्यावरच चपलेनं धुलाई, Video Viral मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोहितसह भाजपच्या महिला नेत्यालाही भाजपमधून बाहेर करण्यात आलं. या सर्व गोंधळानंतर दोन्ही पक्षांकडून पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. मोहितच्या पत्नीने भाजपच्या महिला नेत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना, पोलिसही तेथे आले. पण मोहितच्या पत्नीला इतका राग आलेला की तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी मोहित यांच्यासोबत असलेल्या महिला नेत्यालाही मारहाण केली.

    जाहिरात

    मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. दोघांमधील संबंध चांगले नव्हते. दरम्यान, मोहितला भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले. यानंतर त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात