मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सुनेने मेव्हण्यासोबत मिळून घातला गोंधळ, घराचं मागचं दार खुलं ठेवलं अन्...

सुनेने मेव्हण्यासोबत मिळून घातला गोंधळ, घराचं मागचं दार खुलं ठेवलं अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

जेव्हा पोलिसात याबाबत तक्रार करण्यात आली, तेव्हा याचा खुलासा झाला.

  • Published by:  Meenal Gangurde
बैतूल, 19 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे घरातील सुनेने आपल्याच सासूचे तब्बल 6 लाख किमतीचे दागिने फिल्मी स्टाइटने चोरी केले. तिने या कामासाठी मेव्हणा आणि बहिणीलाही सोबत घेतलं. यानंतर दागिने आणि कॅश चोरी करून घरातच खड्डा खणून त्यात सर्व पुरलं. जेव्हा पोलिसात याबाबत तक्रार करण्यात आली, तेव्हा याचा खुलासा झाला. ही घटना बैतूल शहरातील मोती वॉर्ड येथील आहे. येथे रामेश्वर वाघमारेने 16 ऑगस्ट रोजी आपल्या घरात चौरी झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासासाठी पोलीस घरी पोहोचले. पोलिसांनी घरात तपास केला. यावेळी घराची खिडकी, दार सर्व काही शाबूत होतं. याचा अर्थ घरातील कोणी तरी चोरी केल्याचा संशय होता. चौकशीअंती घरातील सून, तिची बहिणी आणि बहिणीच्या नवऱ्याला अटक करण्यात आली. याशिवाय चोरी केलेल्या वस्तू आणि दागिने ताब्यात घेण्यात आले. प्रेमासाठी आईचाच गळा घोटला; लेकीच्या कृत्याने गडचिरोलीत खळबळ सूनेनेच केला खुलासा... पोलीस चौकशी करीत असताना लहान सून संध्या वारंवार आपला जबाब बदलत होती. यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संध्या, तिची बहिणी आणि बहिणीच्या नवऱ्याला अटक करण्यात आली. संध्याने सांगितलं की, तिने 14 ऑगस्ट रोजी माहेरी जाण्याचा प्लान केला. यावेळी ती घरातील मागचं दार खुलं सोडून निघून गेली. यानंतर रस्त्यात तिची बहिणी आणि मेव्हणा भेटले. यांना सोबत घेऊन ती पुन्हा सासरी पोहोचली आणि मागच्या दाराने घरात पोहोचली. यानंतर सासूचे दागिने चोरी केले. यानंतर सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या, जेणेकरून चोरीचा संशय निर्माण होईल.

 
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या