नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : अनेकदा वादाच्या प्रसंगात लोक शिवीगाळ करायला सुरुवात करतात. जीवे मारण्याची किंवा समोरच्याला बघून घेतो, अशी धमकीही देतात. बऱ्याचजणांना याबद्दल काहीही कारवाई होणार नाही, अशी खात्री असते. पण, कायद्याची अनेक कलमे अशा प्रकरणांना गांभीर्याने घेतात. हे फक्त गंभीर गुन्हे मानले जात नाहीत तर गुन्हेगारांना तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. नुकतेच नोएडातील दोन वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये गैरवर्तनाची प्रकरणे आपल्या पाहण्यात आली असतील. यानंतर पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना पकडले. या दोन्ही घटना हाय प्रोफाईल सोसायटीतील आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात शिवीगाळ, असभ्यता, गैरवर्तन अशा अनेक घटना आजूबाजूला दिसतात. कधीकधी त्या इतक्या वाढतात की यात गंभीर परिस्थिती किंवा मोठे वाद उद्भवतात. या संदर्भात कायदा काय सांगतो? एकाच कॉलनीत किंवा गावात राहणारे लोक भांडण झाल्यावर एकमेकांना शिवीगाळ तर करतातच, शिवाय त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना फोन करून जीवे मारण्याच्या धमक्याही देतात, असे अनेकदा दिसून येते. अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अश्लील शिवीगाळ, गैरवर्तन आणि जीवे मारण्याची धमकी देणे हे दंडनीय गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात. असे करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. हा दंडनीय गुन्हा का आहे? अशा गुन्ह्यांवर सीआरपीसी कलम 154 अंतर्गत थेट पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला जातो. एकमेकांना अश्लील शिवीगाळ करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 294 नुसार दंडनीय गुन्हा आहे. जरी अशी बहुतेक प्रकरणे सामंजस्याने सोडवली जात असली तरी कलम 294 हे महत्त्वाचे कलम यात आहे. यानुसार दोन्ही पक्षकारांव्यतिरिक्त इतरही तक्रार करू शकतात. कारण पीडित व्यक्तीला शिवीगाळ केल्याने केवळ पीडितालाच त्रास होत नाही तर लोकांनाही त्रास होतो. विवाहबाह्य संबंधामुळे भाजपमधील करिअरचाच The End; पक्षाने घेतला मोठा निर्णय किती शिक्षा? या कलमांतर्गत आरोपीला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जक दंड भरला तर अशा प्रकरणांमध्ये आरोपींना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. मात्र, खटला अनेक वर्षे चालतो. आरोपींना न्यायालयात हजेरीसाठी जावे लागते. जामीनही घ्यावा लागतो. जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा वादात एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे नित्याचे झाले आहे. सार्वजनिक ठिकाणीही असे प्रकार खूप घडतात. रस्त्यावरच्या रागातही लोक अशा धमक्या देतात. अशा वादात कोणी धमक्या दिल्यास त्याच्यावर तत्काळ रिपोर्ट लिहून कारवाई केली जाऊ शकते. 7 वर्षांपर्यंत कारावास जीवे मारण्याची धमकी देणे हा साधा गुन्हा मानला जातो. पण, तो साधा गुन्हा नाही. भारतीय दंड संहितेच्या कलम 506 मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, जर जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल, तर तसे करणे हा गुन्हा मानला जाईल आणि त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. याबाबत ठोस रिपोर्ट दाखल केला जाईल. खटला तयार करून संबंधित न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. मात्र, अशा प्रकरणांमध्ये जामीन सहज मिळतो आणि नंतर खटला चालवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.