नवी दिल्ली, 7 जुलै : राजधानी दिल्लीतील पालम विहार भागात झालेल्या डबल मर्डर हत्याकांडाचा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एअरफोर्स कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एकाला अटक केली आहे. आरोपीचं नाव अभिषेक वर्मा असून तो एअरफोर्स जवानाची पत्नी मृत बबिता वर्माचा भाऊ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक वर्माला एअरफोर्स कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे 50 हजार परत करावयाचे होते. मात्र तो पैसे देण्यास नकार देत होता. यावर कुटुंबाकडून वारंवार अभिषेक वर्माला टोमणे मारले जात होते. आणि हत्यांकाडाच्या दिवशीच त्यांचा वादही झाला होता.
डीसीपी दक्षिण पश्चिमये प्रताप सिंह यांनी सांगितले की, अभिषेकने संपूर्ण नियोजन करुन ही हत्या घडवून आणली. यासाठी तो पालम विहार परिसरातील एअर फोर्स जवानांच्या घरी पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्याबरोबर जास्तीचे कपडेही घेतले होते. सर्व प्रथम तो स्कूटीने मेट्रो स्थानकात पोहोचला. तेथे त्याने आपली स्कूटी पार्क केली आणि रिक्षातून एअरफोर्सच्या जवानांच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करताच त्याने प्रथम बबिता वर्माची हत्या केली.
हे ही वाचा-तुमची मुलं Online Game खेळतात? नागपुरात अल्पवयीन मुलीला बसला फटका, अश्लील Video
त्यानंतर आरोपीने त्याचा मुलगा गौरव याचीही हत्या केली. घरातील डंबल्सनी त्याने ही हत्या केली. दुहेरी हत्येची घटना घडल्यानंतर, आरोपी अभिषेक वर्मा याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात कपाट उघडलं आणि तिथे असलेल्या वस्तू अस्ताव्यस्त केल्या. ज्यायोगे ही हत्या लुटीतून घडली असावी, असा पोलिसांना संशय निर्माण होईल. इतकेच नाही तर घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन मारेकरी अभिषेक वर्मा तेथून पळून गेला.
एअरफोर्सचे जवान कृष्ण जेव्हा सायंकाळी घरी पोहोचले तेव्हा घरातील अवस्था पाहून ते घाबरले. घरात त्यांची पत्नी आणि मुलाची हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्हीचा तपास सुरू केला. ज्यातील एका फुटेजमध्ये आरोपी दिसून आला. सीसीटीव्हीच्या तपासादरम्यान मेट्रो स्टेशनजवळ पोलिसांना ती संशयास्पद व्यक्ती एका रिक्षाचालकासोबत बोलताना दिसून आली. पोलिसांच्या टीमने त्या रिक्षेचालकाचा तपास सुरू केला आणि शेवटी गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. आणि जेव्हा तो मेट्रो स्टेशनवर उतरला तेव्हा त्याने एक फाटलेली नोट दिली. मात्र रिक्षाचालकाने ती नोट घेण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने रिक्षाचालकाने पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट केलं. त्यामुळे आरोपी बराच काळ तेथे उभा होता. आणि त्याचमुळे त्यांच्या अंगावरील रक्ताचे डागही दिसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news