जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ब्युटी पार्लरच्या आड सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; अशी ठरवायचे तरुणींची किंमत

ब्युटी पार्लरच्या आड सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; अशी ठरवायचे तरुणींची किंमत

ब्युटी पार्लरच्या आड सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; अशी ठरवायचे तरुणींची किंमत

मोबाइलवरुन ग्राहकांची बुकिंग केली जात होती आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

नोएडा, 26 जून : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये (Noida) सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. नोएडा पोलिसांनी ब्यूटी पार्लरच्या आडून सुरू असलेल्या देह विक्रय व्यापाराचा पर्दाफाश करीत घटनास्थळावरुन 3 तरुणींची सुटका केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन देह विक्रीसाठी वापरले जाणारे मोबाइलही जप्त केले आहेत. पोलिसांना यावेळी ग्राहकांचा हिशोब ठेवणारे रजिस्टर आणि फोन नंबरच्या दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सेक्टर 73 मध्ये ब्युटी पार्लरमध्ये ऑनलाइन देह विक्रयचा व्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच टीम घेऊन त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये धाड टाकली. छापेमारी दरम्यान पोलिसांनी येथील तीन पीडित तरुणींची सुटका केली. या मुलींना जबरदस्तीने व्यवसायात अडकविण्यात आलं होतं. पोलिसांनी धाड मारताच ब्यूटी पार्लरची संचालिका फरार झाली. हे ही वाचा- 5 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची शिक्षा, लग्नानंतर नवरदेवाची थेट तुरुंगात पाठवणी पीडित तरुणींनी सांगितलं की, न्यू लकी पार्लरची मालकीण पायल चौहान उर्फ प्रिया सेक्टर 49 येथे ब्यूटी पार्लरसह स्पादेखील चालवित होती. लॉकडाऊनमुळे स्पा सेंटर बंद होतं, मात्र ब्यूटी पार्लरचं काम सुरू होतं. आम्ही ब्यूटी पार्लरमध्ये काम करतो. आमच्या गरीबीची फायदा घेऊन जबरदस्ती प्रिया आमच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करवून घेत होती. आणि मोबाइलवरुन मुलींची बुकिंग केली जात होती. आम्हाला ग्राहकांसोबत देह विक्री हेतूने पाठविलं जात होतं. अनेक तरुणींची केली फसवणूक येथील मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी दिलेल्या पैशातून त्या स्वत:चं कमिशन घेतात. या कामापासून वाचण्यासाठी कधी कामावर आलो नाही तर ब्यूटी पार्लरची संचालिका फोन करून धमकी देत होती. कोणताही मार्ग नसल्यामुळे प्रियाच्या म्हणण्यानुसार आम्ही वागत असल्याचं तरुणींनी सांगितलं. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक तरुणींना प्रियाने अडकवून ठेवलं होता. ती सौंदर्यानुसार तरुणींची किंमत लावत असे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात