नोएडा, 12 मार्च : ग्रेटर नोएडातील रोजा जलालपुरमधील एका तरुणाने दारू पिण्यास नकार दिला म्हणून बहिणीला गोळी (Killed Sister) घालून मारून टाकलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडामधील रोजा जलालपूरमधील सूरज (22) याने मोठी बहीण रूची (32) हिची गोळी घालून हत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, सुरजला दारूचं व्यसन आहे. शुक्रवारी रात्री सूरज दारू पिऊन घरी आला. यावर बहीण संतापली आणि दारू पिण्याच्या त्याच्या सवयीमुळे ओरडली. यामुळे संतापलेल्या सूरजने आपल्या बहिणीवर पिस्तूल रोखली आणि तिच्यावर गोळी चालवली. या घटनेत रूचीचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. (The brother murdered his sister after repeatedly interrupting her to give up alcohol) सूरजला दारूचं व्यसन.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिसरख पोलीस ठाणे हद्दीतील ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये जलालपूर गावात सूरज आपल्या कुटुंबासह राहतो. सुरजच्या घरात त्याच्या 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. सूरजसह त्याचे आई-वडीलही राहतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय सूरज याला दारूचं व्यसन आहे. सूरजची 32 वर्षीय बहिण जलालपूर गावात आपल्या पतीसोबत राहते. काल रात्री सूरज दारू पित होता. याला विरोध केल्यामुळे त्याने बहीण रूचीचीच हत्या केली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबात गोंधळ उडाला. या प्रकरणात रूचीच्या पतीने सूरजविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. हे ही वाचा- ‘सॉरी बाबा, जे वाचतो ते विसरून जातो’; नववीच्या विद्यार्थ्याने स्वत:लाच संपवलं! भावाच्या प्रेमाखातर बहिण समजावत होती… पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय हरदोई येथील राहणारं आहे. आरोपी सूरजचं दारू पिण्यावरुन कुटुंबीयांसोबत अनेकदा वाद झाला आहे. त्याची मोठी बहिण वारंवार त्याला यावरुन समजावत होती. मात्र तो ऐकत नव्हता. शेवटी त्याने तिचा जीवच घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.