Home /News /crime /

अत्यंत बीभत्स घटना; मुलाने आईची हत्या करुन मृतदेहासोबत केला धक्कादायक प्रकार

अत्यंत बीभत्स घटना; मुलाने आईची हत्या करुन मृतदेहासोबत केला धक्कादायक प्रकार

या मुलाने आईच्या हत्येमागील धक्कादायक कारण न्यायालयात दिलं आहे.

    स्‍पेनमध्ये एका नरभक्षी मुलाने आपल्या आईची हत्या करीत त्याचा मृतदेहाचे 1000 छोटे-छोटे तुकडे केले आहेत. यानंतर तिच्या मांसाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. आणि तब्बल 2 आठवड्यांपर्यंत तो आपल्या आईचं शव खात राहिला. यादरम्यान त्याने आपल्या कुत्र्यालाही आईचं मांस खायला दिलं. स्पेनच्या एका न्यायालयात मारेकरी मुलगा सांचेज गोमेजला आई मारिया सोलेदाद गोमेज हिच्या हत्येसाठी दोषी ठरवलं आहे. ही बीभत्स घटना फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती आणि सहा मे रोजी संपलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने मुलगा गोमेजला हत्येसाठी दोषी करार दिला आहे. नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने गोमेजचा दावा फेटाळून लावला आहे. आईची हत्या केली तेव्हा तो मानसिक रुग्ण होता हा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. गोमेज आपल्या आईच्या मागे लपून गेला आणि गळा दाबून त्यांची हत्या केली. यानंतर गोमेजने आपल्या आईच्या मृतदेहाचे 1000 छोटे-छोटे तुकडे केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सुनावणीदरम्यान साक्ष देताना सांगितलं की, गोमेजने दावा केला होता की, त्याने शरीराचे काही भाग चावून खाल्ले होते. तर अन्य भाग शिजवून खाल्ले. इतकच नाही तर गोमेजने आईच्या मृतदेहाचे काही भाग कुत्र्यालाही खाऊ घातलं होतं. मृतदेह कापण्यासाठी गोमेजने आरी आणि चाकूचा वापर केला होता. हे ही वाचा-रिसॉर्टमध्ये सेक्सदरम्यान पतीला अचानक आली झोप; सकाळी मृत अवस्थेत आढळली महिला नरभक्षी मुलासाठी 15 वर्षे 5 महिन्यांची शिक्षेची मागणी दुसरीकडे गोमेजने दावा केला आहे की, जेव्हा तो टीव्ही पाहत होता तेव्हा त्याला आपल्या आईला मारण्याचा गुप्त संदेश मिळाला होता. त्यानंतर नरभक्षी मुलाला 15 वर्षे 5 महिन्यांची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप सुनावणीमध्ये सामील न्यायाधीशांनी या शिक्षेला मंजुरी दिलेली नाही. जगभरात या मुलाच्या कृत्याची निंदा केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Mother killed

    पुढील बातम्या