ब्रिटेनमध् एक दाम्पत्य सुट्ट्यांसाठी आणि रोमँटिक एडवेंचर करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. मात्र पतीला अचानक झोप आल्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात कोर्टाने महिलेचा पती 52 वर्षीय वॉरेन मार्टिन कॉन्टन याला गंभीर निष्काळजीपणा केल्यामुळे दोषी मानलं असून त्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या रोमँटिक एडव्हेंचरअंतर्गत त्यांनी क्लेयरला बांधलं आणि तिच्या तोंडावर मोजे घातले. मार्टिनने खूप जास्त नशा केली असल्याने त्याला झोप आली. तर दुसरीकडे क्लेयरची प्रकृती खालावू लागली. मात्र तिला बांधलेलं असल्या कारणाने ती काहीच करू शकली नाही आणि जागेवरचं तिने जीव सोडला. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.