राजा मयाल, प्रतिनिधी ठाणे, 19 जून : आधी सासरा आणि मेव्हण्यावर चाकूने वार केले. याची तक्रार केल्याने घरावर गोळ्या झाडल्याने ठाण्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपीला अखेर नायगाव पोलिसांनी मनोरच्या जंगलातून अटक केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीने या हल्लामागचं कारण सांगितलं आहे. काय आहे प्रकरण? शुक्रवारी (16 जुन) सासरा यार मोहम्मद सुकुद्दीन चौधरी (वय 74) सासऱ्याला आणि मेव्हणा सलीम टोले यांना त्यांच्या कारखान्यात जावून अॅल्युमिनिअम रॉड आणि चाकूने हल्ला केला होता. आरोपीच्या क्रूरतेची संपूर्ण घटना कंपनीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. आरोपी इब्राहिमच्या मारहाणीत जबर जखमी झालेले 74 वर्षीय यार अहमद सुकुद्दीन व सलीम टोले हे गुन्हा दाखल करण्यासाठी नायगाव पोलीस ठाण्यात गेले होते. याचा राग आल्याने आरोपी इब्राहिम हा पीडित यार अहमद यांच्या घरी गेला. घरावर त्याने दोन गोळ्या झाडून फरार झाला. नायगाव पोलिसांनी आरोपी इब्राहिम हसन शेख याला भादंवि कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वाचा - भाईंदरमध्ये वसलंय ‘बांग्लादेश’! आधार कार्ड, टॅक्स बिल, बस स्टॉपवरही उल्लेख; काय आहे प्रकरण? आरोपीने दिली हल्ल्याची कबुली इब्राहिम हसन शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इब्राहिम हसन शेख याच्या अत्याचाराला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून वडिलांकडे राहायला गेली होती. त्याचा राग येऊन त्याने सासरा आणि मेव्हण्याला मारहाण केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. ठाण्यात गुन्हेगारी वाढली? तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील ढोकाळी परिसरात मटणाच्या दुकानावर पत्ता न सांगितल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदारावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदार बचावला आहे. मात्र या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज चांगलेच व्हायरल झाले आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्ररकरणी फिर्यादी अशपाक शेख याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध कापूरबावडी पोलीस घेत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.