भिवंडी, 1 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील पाये गावाच्या हद्दीतील नवे पेंढरी पाडा येथील शेतात काम करण्यास सांगितल्याचा रागातून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी मुलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरेश धर्मा धिंडा वय 50 असे शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे.
डिसेंबर 2017 मध्ये मला शेतातील कामास मदत कर, असं वडिलांनी सांगताच मद्यपी मुलाने आपले वडील धर्मा शंकर धिंडा वय 72 यांची निर्घृण हत्या केली होती. या बाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजीव पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी भरत शेगर ,राजेंद्र शेंडे ,कैलास वाडविंदे ,जयेश मुकादम या पथकाने शिताफीने तपास करून आरोपी मुलास अटक केली होती.
या प्रकरणी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले गेले असल्याने नुकतंच ठाणे जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश आर एम जोशी यांनी आरोपी सुरेश धिंडा यास जन्मठेप व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या दाव्यात अॅड मती मोहळकर यांनी सरकारी बाजू मांडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news